Abhishek Ghosalkar News राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; घोसाळकर हत्येनंतर संजय राऊतांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 22:58 IST2024-02-08T22:22:50+5:302024-02-08T22:58:13+5:30
Sanjay Raut on Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकर यांची आज फेसबुक लाईव्हमध्ये हत्या करण्यात आली आहे. अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

Abhishek Ghosalkar News राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; घोसाळकर हत्येनंतर संजय राऊतांची मागणी
शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आज फेसबुक लाईव्हमध्ये हत्या करण्यात आली आहे. अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत. पक्षात प्रवेश देत आहेत. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात.पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत..राज्य गुंडांच्या तावडीत आहे.म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत.
अभिषेक… pic.twitter.com/Q4LSeXzO2F
अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी ट्विट केले आहे.