शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गणित सुटलं! महाराष्ट्रात ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 11:48 IST

काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले.

मुंबई - Amit Shah Meeting ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं पुढे आले आहे. महायुतीत ३२ जागा भाजपा, शिवसेना ११ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघाला आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण १६ जागा दिल्या जातील. त्यातील ११ जागा शिवसेनेला तर ५ जागा राष्ट्रवादीला असा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे. रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी एक जागा अजित पवारांना सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवतील. 

मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्टहाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन शाह यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत सर्वकाही अंतिम करण्यात आले. सुरुवातीला शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली, त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले. या दोघांनंतर शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेतली. 

सूत्रांनुसार, ही बैठक ४५ मिनिटे चालली. त्यात बहुतांश जागांवर एकमत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला केवळ जिंकण्याची क्षमता असणाऱ्या आधारे जागा मिळतील. काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने २५ तर शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंसोबत १३ खासदार आले आहेत.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४