डोंबिवलीत सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभाला विरोध; सोसायटीत मराठी-अमराठी सदस्य भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:06 IST2025-01-28T13:04:36+5:302025-01-28T13:06:04+5:30

Dombivli Puja Controversy: डोंबिवलीच्या नांदिवली भागात हा प्रकार घडला. सध्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

In Dombivli Opposed to Satyanarayan Puja, Haldi Kunku ceremony in Society; Marathi and Non Marathi members word clashes | डोंबिवलीत सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभाला विरोध; सोसायटीत मराठी-अमराठी सदस्य भिडले

डोंबिवलीत सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू समारंभाला विरोध; सोसायटीत मराठी-अमराठी सदस्य भिडले

डोंबिवली - मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी यांच्यातील वाद अनेकदा ऐकायला मिळतो. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा डोंबिवलीत एका सोसायटीत मराठी आणि अमराठी लोक भिडल्याची घटना घडली. सोसायटीतील सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी सदस्यांनी विरोध केला त्यावरून हा वाद उफाळून आला. त्यात हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले.

डोंबिवलीच्या नांदिवली भागात हा प्रकार घडला. सध्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वादावर सोसायटीतील एका मराठी महिलेने सांगितले की, हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजा आम्ही सोसायटीत आयोजित केली होती. परंतु आम्हाला न विचारता तुम्ही हे कसं केले असा प्रश्न अमराठी सदस्याने विचारला. हे सर्व आम्ही आमच्या स्वखर्चाने करत होतो. त्यात सोसायटीचा कुठेही पैसा नव्हता. मराठी माणसांना शिवीगाळ करून त्याने वाद घातला असा आरोप महिलेने केला. त्यामुळे संबंधिताविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचं सांगण्यात आले.


तसेच अमराठी सदस्याने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सत्यनारायण पूजेबाबत आक्षेपार्ह भाष्य केले. हळदी कुंकू करणाऱ्या महिलांना दमदाटी करून ते रोखण्याचा प्रकार केला. त्यावरून वाद वाढला. त्यावरून सगळ्या महिला एकत्र आल्या असताना त्याने मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ केली. 

दरम्यान, डोंबिवलीच्या नांदिवली भागात असणाऱ्या या सोसायटीत गेल्या ७ वर्षापासून वाद आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम करत नव्हते. तेव्हा सोसायटीतील महिलांनी एकत्रित येत २ फेब्रुवारीला हळदी कुंकू समारंभ आयोजित करूया असं ठरवले. कमिटीची कुठलीही आर्थिक मदत न घेता स्वखुशीने वर्गणी जमा करून ते कार्यक्रम करणार होते. परंतु सोसायटीच्या नोटिस बोर्डवर वर्गणीचं पोस्टर लावले होते. मात्र या कार्यक्रमाला अनिल भट या विरोध दर्शवला. चिराग लालन हेदेखील तिथे राहतात त्यांनी मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले अशी तक्रार आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांनी दिली.  

पनवेलमध्येही मराठी कुटुंबावर दादागिरी

पनवेलच्या हिरानंदानी सोसायटीत भाड्याने राहणाऱ्या गायकवाड या मराठी कुटुंबावर अमराठी सदस्यांनी दादागिरी केल्याचं समोर आले. घरमालकाने मराठी कुटुंबाला घर दिले तरीही सोसायटी चेअरमन घर सोडण्यास दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. घरात लहान बाळ आणि वयोवृद्ध सासू सासरे असताना चेअरमनकडून घर सोडून जा, गेटच्या बाहेर जा असं धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेची दखल घेत मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी चेअरमन वसुंधरा शर्मा यांनी माफी मागायला लावली आहे. 

Web Title: In Dombivli Opposed to Satyanarayan Puja, Haldi Kunku ceremony in Society; Marathi and Non Marathi members word clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.