मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीत सुधारणा

By Admin | Updated: May 14, 2014 23:00 IST2014-05-14T19:16:26+5:302014-05-14T23:00:03+5:30

सुमारे १५६ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाने आशियातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत बाजी मारली आहे.

Improvements in the University of Mumbai | मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीत सुधारणा

मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीत सुधारणा

मुंबई :
सुमारे १५६ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाने आशियातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत बाजी मारली आहे. आशियातील १५० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश झाला असून गतवर्षीच्या तुलनेत विद्यापीठाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. नव्या क्रमवारीनुसार विद्यापीठ १३१ व्या स्थानावर पोहचले आहे. तर देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठ दुसर्‍या क्रमांकावर पोहचले असून महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठ अव्वल स्थानावर कायम राहिले आहे.
क्वाकारेली सायमंड या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीत पहिल्या दीडशे विद्यापीठांच्या यादीत भारतातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश झाला आहे. समाजाचे बौध्दिक आणि नैतिक शक्तीस्थान म्हणून ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाने १५६ वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या ७30 सलंग्नित महाविद्यालयातून जवळपास सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमूख शिक्षणाची कास धरणार्‍या मुंबई विद्यापीठांने या शैक्षणिक वषार्पासून व्यवसायाभिमूख अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
गेल्या वर्षी या संस्थेने जाहीर केलेल्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ आशिया खंडातील विद्यापीठांमध्ये १४0 व्या स्थानावर होती. गेल्या वर्षभरात विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावला आहे. या वर्षीच्या क्रमवारीत विद्यापीठ १३१ व्या स्थानावर पोहचले आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयाला नॅक दर पाच वर्षांनी भेट देते. विद्यापीठाच्या कार्यानुसार नॅक श्रेणी देते. नॅकमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि वैचारिक पातळी वाढते व त्याचा संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी विविध सोयी दिल्या जातात.त्याचा फायदा विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला नक्कीच होतो. याच विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ येत्या काही काळात शंभरातही आपले स्थान निर्माण करेल असा आशावाद विद्यापीठाने व्यक्त केला आहे.

Web Title: Improvements in the University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.