पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा, अफवांवर विश्वास ठेवू नका, विश्वजित कदम यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 23:28 IST2018-03-04T23:28:11+5:302018-03-04T23:28:11+5:30
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पतंगराव कदम यांची प्रकृती सुधारत असून, ते लवकरच सर्वांच्या भेटीकरीता येतील. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पतंगरावांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे.

पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा, अफवांवर विश्वास ठेवू नका, विश्वजित कदम यांचे आवाहन
मुंबई - माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पतंगराव कदम यांची प्रकृती सुधारत असून, ते लवकरच सर्वांच्या भेटीकरीता येतील. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पतंगरावांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले डॉ. पतंगराव कदम गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच बिडघल्याने त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पतंगराव यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातवरण होते. त्यामुळे संभ्रम दूर करण्यासाठी विश्वजित कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पतंगरावांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.