शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 17:51 IST

विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याआधीच जागावाटप जाहीर करून मित्रपक्षांतील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून होऊ शकतो.

Mahayuti PC ( Marathi News ) : महाविकास आघाडीने काल पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात हल्लाबोल केल्यानंतर आता महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून उद्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या दुपारी अडीच वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास काही तास बाकी असताना महायुतीकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आल्याने यातून कोणती मोठी घोषणा करण्यात येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराची घोषणा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात झाली. याचा मोठा फटका लोकसभेवेळी महायुतीला बसला आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारत राज्यात ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू असून मागील काही दिवसांत जागावाटप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक बैठका पार पडल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याआधीच जागावाटप जाहीर करून मित्रपक्षांतील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून होऊ शकतो.

मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय होणार?

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर नक्की कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत सस्पेन्स आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदावरून संघर्ष सुरू असताना महायुतीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करून आघाडी घेतली जाते का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतून महायुतीवर अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांना उद्याच्या पत्रकार परिषदेतून उत्तर देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

महाविकास आघाडीकडून पुस्तिकेचे प्रकाशन

महायुती सरकारच्या कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. वांद्रे येथील हॅाटेल ताज लँड्स एंडमध्ये मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, अनिल देसाई,  आदित्य ठाकरे आदीं उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती