शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 16:10 IST

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण तंदुरुस्त राहण्यासाठी थोडावेळ तरी चालतो. यामुळे आपल्यालाही फायदा होते. परंतू, तुमच्या चालण्याने गरजवंतांना मदत मिळत असेल तर काय वाईट आहे.

मुंबई : आयआयटीच्या दोन मित्रांमध्ये लागलेल्या धावण्याच्या पैजेतून एक अफलातून कल्पना सुचली आणि दर किमी चालण्यामागे गरजूंना 10 रुपयांची मदत मिळू लागली. चालून कसे पैसे दान करता येतील, असा प्रश्न पडला असेल ना? पण हे खरे आहे. इम्पॅक्ट या अ‍ॅपच्या माध्यमातून आयआयटीच्या दोन मित्रांनी ही शक्कल लढविली आहे. चला जाणून घेऊयात.

ईशान नाडकर्णी आणि निखिल खंडेलवाल यांनी हे अ‍ॅप बनविले आहे. आणि हे अ‍ॅप 1 लाख जणांनी डाऊनलोडही केले आहे. यामध्ये भारतातील 95 हजार तर परदेशातील 5 हजार युजर्सनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपला आरती इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, वेलस्पन, एसबीआय, डीएचएल आणि हिमालया सारख्या कंपन्या सीएसआर फंडातून मदत पुरवतात. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरही या अ‍ॅपसोबत काम करत होती. सीएसआर फंडातून पैसे सामाजिक संस्थांना वळते केले जातात. ही रक्कम कोणत्या संस्थेला द्यायची याची निवड युजर करू शकतो. 

पैसे न देताही कशी कराल मदत?आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण तंदुरुस्त राहण्यासाठी थोडावेळ तरी चालतो. यामुळे आपल्यालाही फायदा होते. परंतू, तुमच्या चालण्याने गरजवंतांना मदत मिळत असेल तर काय वाईट आहे. हे अ‍ॅप यासाठी मदत करणार आहे. दर 1 किमी चालणे किंवा धावल्यावर सामाजिक संस्थांना सीएसआर फंडांतून 10 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी केवळ हे अ‍ॅप इन्स्टॉल करून आपले वय आणि वजन टाकावे लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप चालतेवेळी सुरु करावे लागणार आहे. तुम्ही किती अंतर चालता हे जीपीएस आणि मोबाईलच्या हालचालींवर मोजले जाणार आहे. यानुसार तुम्ही निवडाल त्या सामाजिक संस्थेला हे पैसे वळते केले जाणार आहेत. 

4 कोटींची मदतआतापर्यंत या अ‍ॅपवरून गरजवंतांना 4 कोटींची मदत देण्यात आली असून यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शहीद जवानांचे कुटुंब, मुंबईतील झोपड्यामध्ये राहणाऱ्या महिला आणि जळगावमध्ये 11250 रोपट्यांचे रोपण करण्यात आले आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकFarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी