Impact App Just Walk 1 KM & Help Needy | भन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत!
भन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत!

मुंबई : आयआयटीच्या दोन मित्रांमध्ये लागलेल्या धावण्याच्या पैजेतून एक अफलातून कल्पना सुचली आणि दर किमी चालण्यामागे गरजूंना 10 रुपयांची मदत मिळू लागली. चालून कसे पैसे दान करता येतील, असा प्रश्न पडला असेल ना? पण हे खरे आहे. इम्पॅक्ट या अ‍ॅपच्या माध्यमातून आयआयटीच्या दोन मित्रांनी ही शक्कल लढविली आहे. चला जाणून घेऊयात.


ईशान नाडकर्णी आणि निखिल खंडेलवाल यांनी हे अ‍ॅप बनविले आहे. आणि हे अ‍ॅप 1 लाख जणांनी डाऊनलोडही केले आहे. यामध्ये भारतातील 95 हजार तर परदेशातील 5 हजार युजर्सनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपला आरती इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, वेलस्पन, एसबीआय, डीएचएल आणि हिमालया सारख्या कंपन्या सीएसआर फंडातून मदत पुरवतात. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरही या अ‍ॅपसोबत काम करत होती. सीएसआर फंडातून पैसे सामाजिक संस्थांना वळते केले जातात. ही रक्कम कोणत्या संस्थेला द्यायची याची निवड युजर करू शकतो. 

पैसे न देताही कशी कराल मदत?
आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण तंदुरुस्त राहण्यासाठी थोडावेळ तरी चालतो. यामुळे आपल्यालाही फायदा होते. परंतू, तुमच्या चालण्याने गरजवंतांना मदत मिळत असेल तर काय वाईट आहे. हे अ‍ॅप यासाठी मदत करणार आहे. दर 1 किमी चालणे किंवा धावल्यावर सामाजिक संस्थांना सीएसआर फंडांतून 10 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी केवळ हे अ‍ॅप इन्स्टॉल करून आपले वय आणि वजन टाकावे लागणार आहे. यानंतर हे अ‍ॅप चालतेवेळी सुरु करावे लागणार आहे. तुम्ही किती अंतर चालता हे जीपीएस आणि मोबाईलच्या हालचालींवर मोजले जाणार आहे. यानुसार तुम्ही निवडाल त्या सामाजिक संस्थेला हे पैसे वळते केले जाणार आहेत. 


4 कोटींची मदत
आतापर्यंत या अ‍ॅपवरून गरजवंतांना 4 कोटींची मदत देण्यात आली असून यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शहीद जवानांचे कुटुंब, मुंबईतील झोपड्यामध्ये राहणाऱ्या महिला आणि जळगावमध्ये 11250 रोपट्यांचे रोपण करण्यात आले आहे. 


Web Title: Impact App Just Walk 1 KM & Help Needy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.