शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले’’, नाना पटोलेंची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 17:45 IST

Nana Patole Criticize State Government: राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

राज्यातील सरकारविरोधात काँग्रेसने आजपासून जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून विदर्भातील जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याला कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची लूट सुरू असून, भरती परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर, महिलांवर आणि लहान मुलावर या येड्यांच्या सरकारने लाठी हल्ला केला व हवेत गोळीबार केला. केंद्र सरकारने आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाशक्तीच नाही. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये राज्यभरात विविध ठिकाणी सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यात आल्या. आताही इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये सुरू असताना निष्पाप मराठा बांधवांवरती लाठी हल्ला करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न केला, असा आरोपही पटोले यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला हा सरकार पुरस्कृत असून सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस अमानुषपणे असा हल्ला करू शकत नाहीत. जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी हे सरकार राज्यात जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राज्याला मणिपूर प्रमाणे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार