शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

“मी गर्भलिंग निदान करणार नाही आणि होऊ देणार नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 18:24 IST

राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 1 ऑक्टोबर रोजी होणा-या महिला सभेत सहभागी महिला ‘गावात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत.

मुंबई- राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 1 ऑक्टोबर रोजी होणा-या महिला सभेत सहभागी महिला ‘गावात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत. सोबतच ‘मुलगी शाळाबाह्य होऊ देणार नाही, ग्रामपंचायत विकास आराखड्यातील (GPDP) 10 टक्के निधी महिलासाठी राखीव आणि महिलांना उघड्यावर शौचास जावे लागू नये यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधण्यात येईल असे ठराव होणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी होणा-या महिला सभेत महिलांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने ठराव करावे अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याला मंजुरी देत आयोगाने सुचविलेले सर्व ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी करावे असे आदेश राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यामार्फत ग्रामपंचायतीना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना ताकद देणा-या  73 व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीला यंदा  25  वर्ष पूर्ण होत असून गावपातळीवरील महिलांना गावाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी महिला सभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महिला आर्थिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्टया ही सक्षम व्हाव्यात या दृष्टीने दि 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महिला सभेत पुढील ठराव करण्यात येणार आहेत.

 - महिला सक्षमीकरणाचा महत्वाचा मानक म्हणजे अर्थकारणात महिलांचा समान अधिकार आणि समान सहभाग असणे. याच उद्देशाने राज्य महिला आयोगाने राज्य पातळीवर जेंडर बजेट चा आग्रह धरला. हाच विचार ग्रामपंचायत पातळीवर रुजण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या महिला सभेत ग्रामपंचायत विकास आराखड्यातील (GPDP) 10 टक्के निधीची कामे गावातील महिलांच्या मागणीनुसार आणि महिलांच्या मान्यतेने मंजूर करून घ्यावीत. पंचायत स्तरावर GPDP  ला मान्यता देताना, त्यातील 10 टक्के कामे 1 ऑक्टोबर च्या महिला सभेत गावातील महिलांच्या मागणीनुसार घेतली असल्याचे दाखविणे अनिवार्य असावे. त्या दृष्टीने GPDP च्या नियोजनात, 1 ऑक्टोबरच्या महिला सभेने सुचविलेली कामे असे स्वतंत्र रकाना असावा. - स्त्री भ्रूण हत्या, मुलींचा घटता जन्मदर यातून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची होणारी पीछेहाट रोखणे गरजेचे आहे.  यासाठी 1 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या महिला सभेत महिलांनी 'गावात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही' असा ठराव करावा. “मी गर्भलिंग निदान करणार नाही, कुटुंबातील कुठ्ल्याही स्त्रीच्या गर्भाचं लिंग निदान करणार नाही आणि होऊ देणार नाही.” अशी शपथ महिला सभेतील महिलांनी घ्यावी आणि त्यानंतर दि.2 ऑक्टोबर रोजी होणा-या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांना “मी कुटुंबातील कुठ्ल्याही स्त्रीच्या गर्भाचं लिंग निदान करणार नाही आणि होऊ देणार नाही.” अशी शपथ देण्यात यावी.    - प्रत्येक मुलीला सन्मान मिळावा, स्वयंपूर्ण होता यावं  यासाठी  “आमच्या गावातील एकही मुलगी शाळाबाह्य होऊ देणार नाही” असा ठराव महिला सभेत  करण्यात यावा. शाळातील मुलींची गळती थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने सक्रिय पावले उचलावी.   - महिलांना उघड्यावर शौचास जावे लागू नये यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधण्यात येईल याकरिता आर्थिक मदत ग्रामपंचायतीकडून  करण्यात येईल असा ठराव या ग्रामसभेत करण्यात यावा. शौचालय बांधण्याबरोबरच त्याचा वापर करण्याची मानसिकता निर्माण होण्याकरिता जनजागृती मोहीम ग्रामपंचायतीकडून हाती घेण्यात यावी.        याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या कि, ‘गावातील महिलांनी एकत्र येत हे ठराव करून त्याची प्रभावी अमलबजावणी केल्यास स्त्री भ्रूण हत्या, मुलींचे शाळाबाह्य होण्याचे प्रमाण रोखता येणार आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या  अधिकार मिळावे या उद्देशाने होणारा ग्रामपंचायत विकास आराखड्यातील (GPDP) 10 टक्के निधीबाबतचा ठराव ही महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधण्यासोबतच त्याचा वापर व्हावा यासाठी प्रत्येक घरातून महिलेचा सहभाग असणे आवश्यक  आहे या उद्देशाने या ठराव सूचना देण्यात आल्या आहेत’. अधिकाधिक महिलानी यात सहभागी होऊन न्यू इंडियाच स्वप्न साकार कराव अस आवाहन त्यांनी या निमित्ताने केल आहे.