‘आयएफएस’ अधिकाऱ्यांना वैद्यकीय चाचण्या अनिवार्य
By Admin | Updated: January 20, 2017 05:00 IST2017-01-20T05:00:14+5:302017-01-20T05:00:14+5:30
भारतीय वनसेवेतील (आयएफएस) वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय चाचण्या करून घेत अनिवार्य करण्यात आले

‘आयएफएस’ अधिकाऱ्यांना वैद्यकीय चाचण्या अनिवार्य
अमरावती : भारतीय वनसेवेतील (आयएफएस) वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय चाचण्या करून घेत अनिवार्य करण्यात आले आहेत. या चाचण्या विहित नमुन्यात करावयाच्या असून त्याचा तपासणी अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे.
३१ मार्च २०१६ रोजी वयाची ४० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या महसूल विभागातील प्रपत्र ‘अ’ मध्ये दर्शविलेली खासगी रुग्णालये, वैद्यकीय संस्थांमधून प्रपत्र ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या सर्व वैद्यकीय तपासणी करायच्या आहेत.अहवाल शासनाकडे त्वरेने सादर करण्याचे निर्देश महसूल व वनविभागाचे अवर सचिव सुनील हंजे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)