शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

बारावी पास व्हायचे तर पाणीटंचाईचा अभ्यास करा; 'या' दोन विषयात अनुत्तीर्ण झाला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 07:15 IST

पर्यावरण शिक्षण, जलसुरक्षा विषयाचा मूल्यमापन आराखडा बदलला, श्रेणी गुणपत्रिकेत नोंदविणार

अविनाश साबापुरे यवतमाळ : इयत्ता अकरावी, बारावीसाठी आवश्यक असलेल्या ‘पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा’ या विषयाचा मूल्यमापन आराखडा यंदा बोर्डाने बदलला आहे. आतापर्यंत या विषयाबाबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनाही तसेच खुद्द बोर्डालाही विशेष गांभीर्य नव्हते. मात्र, आता बदललेल्या मूल्यमापनानुसार पर्यावरण व जलसुरक्षेच्या विषयात अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी बारावीच्या परीक्षेतही अनुत्तीर्ण ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील पाणीटंचाईसह विविध पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल द्यावाच लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा विषयाच्या नवीन मूल्यमापन आराखड्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार हा विषय ५० गुणांसाठी सक्तीचा राहणार आहे. यात प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि प्रकल्प अहवालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विषयाचे अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षक असे दोनदा मूल्यमापन होणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना ५० पैकी गुण दिले जाणार आहे. त्या गुणांचे श्रेणीत रूपांतर केले जाईल. त्यानंतर बोर्डाकडून त्याची त्याची तपासणी होणार आहे. यात ए, बी, सी आणि डी अशा श्रेणी दिल्या जाणार आहे. डी श्रेणी मिळालेला विद्यार्थी अनुत्तीर्ण मानला जाणार आहे. या विषयासाठी प्रत्येक महाविद्यालयाला आठवड्यातून दोन तासिका घेणे बंधनकारक आहे. या शिवाय, पाच प्रकल्प आणि पाच सेमिनार करणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक राहणार आहे. प्रकल्प कार्यासाठी ३० तर जर्नल किंवा सेमिनारसाठी २० अशी एकूण ५० गुणांची विभागणी करण्यात आली आहे. पर्यावरणाची समस्या ओळखणे, त्याचा अभ्यास करणे, त्यासाठी प्रत्यक्ष लोकांच्या मुलाखती घेणे, प्रकल्प अहवाल लिहिणे आदी बाबींसाठी विद्यार्थ्यांना गुणदान केले जाणार आहे.राज्यातील प्राध्यापकांचे आजपासून प्रशिक्षणपर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाच्या बदललेल्या आराखड्यानुसार बदललेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे स्वरुप याबाबत १८ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हास्तरावर प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अमरावती येथील सिंधी हिंदी हायस्कूल आणि आयईएस गर्ल्स हायस्कूलमध्ये, यवतमाळ येथील अणे महिला महाविद्यालयात, अकोल्याच्या नूतन हिंदी विद्यालयात, वाशीम येथील सुशिलाताई जाधव विद्यालयात आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्राध्यापकांचे प्रशिक्षण चिखली येथील आदर्श विद्यालयात होणार आहे.अशी ठरेल विद्यार्थ्याची श्रेणीपर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयासाठी अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या कामाची तपासणी होणार आहे. यात ५० पैकी गुणदान केले जाणार आहे. नंतर त्या गुणांचे श्रेणीत रूपांतर करून ती श्रेणी बोर्डाच्या गुणपत्रिकेत नोंदविली जाणार आहे. ३० पेक्षा अधिक गुणाला ए श्रेणी, २३ पेक्षा जास्त गुणांना बी श्रेणी, तर १८ पेक्षा जास्त गुणांना सी श्रेणी मिळणार आहे. मात्र १८ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला डी श्रेणी मिळणार असून तो अनुत्तीर्ण समजला जाणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाenvironmentपर्यावरणWaterपाणी