शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

"जनतेचा कल अन् मताधिक्य पाहिल्यास मविआच्या मागे राज्यातील जनता उभी राहिली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 20:22 IST

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान पार पडलं, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. बरेच उमेदवार आघाडीवर आहेत. निकाल लागायला रात्री उशिर होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवरच असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं त्यांनी सांगितले. 

तर कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असंही जयंत पाटील म्हणाले. पाच जागांपैकी चार जागांवर  महाविकास आघाडी आज पुढे आहे हे फार मोठे असे यश आहे. सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे. मागच्या साडेतीन वर्षात महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने सत्तेत असो अथवा नसो उचलून धरले आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे जयंत पाटील यांनी आभार मानले. 

सर्व्हे खरा ठरला!इंडिया टूडेचा जो सर्व्हे आला होता तो खरा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती या निवडणूक निकालावरून आली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये आमची महाविकास आघाडी पुढे आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीदेखील महाविकास आघाडीला कौल दिला आहे. महाराष्ट्रात धोका देण्याचे जे काम झाले ते महाराष्ट्राने मान्य केलेले नाही. महापुरुषांचा अपमान करण्याचे काम महाराष्ट्रात सातत्याने सत्तारुढ पक्षाकडून व मंत्री आणि राज्यपालांकडून झाला ते महाराष्ट्राने सहन केलेले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामागे महाराष्ट्र ठामपणाने उभा आहे हे यावरून सिद्ध झाले आहे असं जयंत पाटलांनी सांगितले. 

नाशिकमध्ये भाजपा द्विधा मनस्थितीत नाशिकमध्ये भाजपला उमेदवार उभा करता आला नाही. उभा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत होते. तर दुसरीकडे कॉंग्रेसवतीने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली गेली होती. उमेदवारी भरताना थोडासा गोंधळ झाला. त्यानंतर सत्यजित तांबे हे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यात भाजपचा रोल राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या विचाराची लोकं महाराष्ट्रात दिसून आली आहेत असा टोला जयंत पाटलांनी भाजपाला लगावला.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा