मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजपाने थेट श्रीकांत शिंदेंच्या गडाला सुरुंग लावल्याने मोठे नाराजीनाट्य घडले आहे. महायुतीतील अंतर्गत वाद आता थेट कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणातून उफाळून आला आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
शिंदे गटातील मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारामागे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केलेल्या संतापामागे मुख्य कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचे उघड झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ला आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. याच भागात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत. यावरून ही ठिणगी उडाली आहे. गेल्या काही वर्षांपासून रवींद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत रोष आहेच, तो आजच्या बैठकीत बाहेर आला आहे.
शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले होते, त्यांनाच चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. हा युती धर्माचा भंग आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. निधी वाटप आणि वळवण्याबाबतही शिंदे गटाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. जर आपल्या मंत्र्यांना निधी वाटप, अधिकारी बदली असे अधिकारच नसतील कर बैठकीला जाऊन काय उपयोग असे या मंत्र्यांनी शिंदेंना विचारले होते. यानंतरच कॅबिनेट बैठकीपूर्वीच्या बैठकीत शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, असे सांगितले जात आहे.