शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:03 IST

Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला. 

मुंबई - करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला. 

करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले आहे, तर पोटगीची रक्कम वाढविण्यासाठी करुणा यांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

या अर्जांवरील सुनावणीत धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या वकिलांना त्या दोघांचे लग्न झाले, याचे पुरावे मागितले. शर्मा यांच्या वकिलांनी पुरावे सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी ठेवली. 

न्यायालयात काय घडले?मुंडे यांचे वकील : करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांनी अधिकृतपणे विवाह केला नाही.न्यायाधीश : मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचे आई- वडील कोण? मुंडे यांचे वकील : मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे; पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही.न्यायाधीश : मुले जर तुमची आहेत, तर करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत? मुंडे यांचे वकील : दोन्ही मुलांना मुंडे यांनी स्वीकारले आहे आणि त्यांना आपले नाव दिले. करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालविला, याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत. त्यांच्यात पती- पत्नीसारखे संबंध नव्हते आणि दोघांचा अधिकृत विवाह झाला नाही. राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. धनंजय मुंडे यांचा एक विवाह झालेला आहे. त्यामुळे दुसरा विवाह त्यांनी केला नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यात परस्पर संमतीने संबंध होते. त्यांनी ते लपविले नाहीत; पण करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला नाही. विवाह केला नाही, तर पोटगी कशी देणार? मुंडे यांचे वकील :  करुणा शर्मा यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांच्या आसपास आहे. त्या आयकर भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. तरीही त्या पोटगी मागतात.

करुणा शर्मा यांच्या वकिलांचा युक्तिवादधनंजय मुंडे यांनी १९९८ मध्ये करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला. त्यांचा एकत्र फोटोही आहे. या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत.न्यायाधीश : धनंजय मुंडे यांच्याशी करुणा मुंडे यांचा विवाह झाला, याचे काय पुरावे आहेत? शर्मा यांचे वकील : आमच्याकडे पुरावे आहेत. पुरावे सादर करण्यासाठी वेळ द्या. आम्ही पुढील सुनावणीमध्ये पुरावे सादर करू.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपCourtन्यायालय