शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मराठी बोलणार नसाल तर महापौरपद सोडा, मराठी एकीकरण समितीचे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 5:57 PM

महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने  पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले.

मीरा रोड: मीरा-भाईंदर महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने  पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले. आंदोलनात अन्य संघटना आणि पक्षाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते . 

आज पालिकेची महासभा असल्याने सकाळी १०.३० वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत समितीचे सदस्यांनी  हातात निषेधाचे फलक घेऊन मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन केले . समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख , मीरा भाईंदर अध्यक्ष सचिन घरत, रेश्मा डोळस, प्रमोद पार्टे , विद्या बोधे , काजल चौधरी सह माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, जनसंग्रामचे सुहास सावंत , जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम , प्रदीप सामंत, गणेश दिघे,  अजीम तांबोळी , समीर मालपाणी आदी देखील आंदोलनात सहभागी झाले होते. 

मीरा भाईंदर च्या महापौर डिंपल मेहता यांना मराठी बोलणे फारसे जमत नाही . शिवाय अनेक नगरसेवक देखील सर्रास अमराठी भाषेतून बोलतात . शासन आदेशा नुसार राजभाषा मराठीचा वापर कामकाजात केला पाहिजे . परंतु महापौरांसह अनेक नगरसेवक यांना मराठी येतच नाही किंवा थोडं फार येत असल्याने राजभाषा मराठीचा अवमान होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे . महासभा व अन्य सभा तसेच सर्व कामकाज मराठीतून व्हावे यासाठी समितीने आंदोलन केले . 

आंदोलकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या . महासभेचे कामकाज मराठीत झालेच पाहिजे ; महापौर बाई मराठीत बोला , नाहीतर खुर्ची रिकामी करा ; मराठीचा अपमान सहन करणार नाही आदी लिहलेले फलक आंदोलकांनी धरले होते . आंदोलन शांततेत झाले. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी सर्व पक्षीय एकीकरणाच्या माध्यमातून एकत्र व्हायला हवे . मराठी भाषेसाठी आंदोलन म्हणजे इथे कोणाचा व्यक्तिक दोष नाही पण आपल्याच राज्यात आपली मराठी भाषा टिकावी हेच ध्येय. महापौरांनी स्वतः मराठी बोलून सर्वाना सभागृहात मराठी बोलण्यास भाग पाडावे अन्यथा महापौर पद सोडावे अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली . 

राज्यसरकारने लोकप्रतिनिधींना मराठी सक्तीची करावी अन्यथा निवडणूक लढवून देऊ नये. समितीचे हे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन होते. या पुढं मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याची गय केली जाणार नाही व उग्र आंदोलन केले जाईल असे सरचिटणीस कृष्णा जाधव व उपाध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी सांगितले.

भाजपाच्या महापौर डिंपल मेहता यांची आजची पहिलीच महासभा होती . डिंपल यांनी कसेबसे मराठीतून सभागृहाचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला . मधून त्या हिंदी बोलत होत्या . तर अनेक नगरसेवक देखील हिंदीतूनच बोलत होते . शिवसेना नगरसेविका तारा घरत यांनी महासभेत मराठीतून बोला असा आग्रह धरला . 

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरmarathiमराठी