शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

“ चोरांना पॉश लॉकअपमध्ये ठेवलं तर ते जामिन मागणारच नाहीत...”, विश्वास नांगरे पाटलांनी लिहिली अजितदादांची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:27 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) अपघाती निधन झाले. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून झाली आणि शेवटचा श्वासही त्यांनी बारामतीत घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) अपघाती निधन झाले. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून झाली आणि शेवटचा श्वासही त्यांनी बारामतीत घेतला.'एकच वादा अजित दादा', अशी घोषणा देत नागरिकांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. दरम्यान, सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) विश्वास नांगरे पाटील यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली, यावेळी त्यांनी दादांच्या आठवणी लिहिल्या आहेत.

अहिल्यानगर येथे एसपी असताना आपले राजकीय गणित जमत नव्हते, असा स्पष्ट अनुभव माजी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्या काळात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. अचानक आलेल्या फोनमध्ये “तुमची पुणे ग्रामीणला एसपी म्हणून नेमणूक होत आहे, जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याचे नांगरे पाटील सांगतात.

"नियतीचं बोलावणं आल्यावर जावं लागतं" ४ दिवसांपूर्वीच अजित पवार बोलले अन् अचानक घेतला जगाचा निरोप

पूर्वी कोणताही व्यक्तिगत परिचय नसतानाही पोस्टिंगनंतर अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे कोणासाठीही दादांकडून दबावाचा फोन आला नाही, असा ठाम अनुभव त्यांनी नमूद केला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे आयजी म्हणून कार्यरत असताना चाकण, तळेगाव, मुळशी परिसरातील तब्बल २५ गुंडगिरी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला, तर १५० हून अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. या कारवाईनंतर अजित पवार यांनी आवर्जून फोन करून अभिनंदन केल्याची आठवण नांगरे पाटील यांनी सांगितली.

एसपी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिम महाराष्ट्र आयजी म्हणून तीन वर्षे काम करताना कोणत्याही चुकीच्या बाबीसाठी दादांनी दबाव टाकल्याचा अनुभव कधीच आला नाही. बोलण्यात नेहमी अदबीचा सूर असायचा सुरुवातीला “अहो नांगरे पाटील”, नंतर आपुलकीने “अहो विश्वासराव” आणि फोनवर “ऐका ना” अशी प्रेमळ साद असायची.

दादांची कामाची पद्धत अत्यंत पद्धतशीर आणि शिस्तबद्ध होती. पोलीस क्रीडास्पर्धांदरम्यान पंचाने जीन्स पॅन्टला उभी इस्त्री केल्याबद्दल त्यांना सुनावल्याचा किस्सा याच शिस्तीचे उदाहरण आहे. परिसराची स्वच्छता, टापटीप यावर त्यांची बारीक नजर असे. बारामती पोलीस स्टेशनच्या बांधकामावेळी ते किमान डझनभर वेळा साईटवर गेले. बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट राहावा, यासाठी त्यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. परिणामी ‘फाईव्ह स्टार’ दर्जाचे पोलीस ठाणे उभे राहिले.

उद्घाटनावेळी चकाचक लॉकअप आणि समोरचे हिरवेगार लॉन पाहून त्यांनी मिश्कीलपणे, “आता चोरांना अशा पॉश लॉकअपमध्ये ठेवलं तर ते जामिन मागणारच नाहीत,” अशी टिप्पणी केली होती.

दिसायला आणि बोलायला कडक असले तरी दादा अत्यंत संवेदनशील होते. भोरजवळील धरणात बोट उलटून २७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी शासकीय निधीची वाट न पाहता त्या प्रत्येक कुटुंबाला जागेवरच दोन लाखांची मदत दिली.

हायवेवरील डिव्हायडरच्या मुद्द्यावर त्यांनी नांगरे पाटील यांना जाब विचारला. मात्र अपघातांबाबत सादर केलेले सविस्तर प्रेझेंटेशन ऐकल्यानंतर त्यांनी जाहीर सभेत कौतुक केले आणि हा उपक्रम राज्यभर राबवण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या.

पुण्यात एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी सन्मान केला आणि पुण्यातून ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले.

मनाने हळवे, शिस्तीने कडवे आणि स्वभावाने मावळे असलेले हे नेतृत्व सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेले होते. दीनदलितांविषयी कळवळा, विकासाची दूरदृष्टी आणि निर्भीड निर्णयक्षमता यांचा संगम असलेले हे व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्रातून निघून गेले आहे.

“नियती क्रूर झाली की क्षणात होत्याचे नव्हते होते,” अशा शब्दांत नांगरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत दादांना आदरांजली वाहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Vishwas Nangre Patil recalls Ajit Pawar's memory, shares anecdotes.

Web Summary : Vishwas Nangre Patil reminisces about Ajit Pawar's disciplined work ethic, integrity, and compassion. He recalls Pawar's impactful actions and commitment to public service.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील