पीयूसी नसेल तर सी-लिंकवर ‘नो एन्ट्री’
By Admin | Updated: June 10, 2017 01:25 IST2017-06-10T01:25:58+5:302017-06-10T01:25:58+5:30
वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व वाहनचालकांकडे पी.यू.सी. प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाकडे वाहनचालक

पीयूसी नसेल तर सी-लिंकवर ‘नो एन्ट्री’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व वाहनचालकांकडे पी.यू.सी. प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच आता राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंबई मध्य (ताडदेव) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पीयूसी प्रमाणपत्र तपासणीसाठी विशेष मोहीम जून महिन्यात राबविण्यात येणार आहे. ज्या वाहनांकडे ‘पीयूसी’ नसेल अशा वाहनांना वांद्रे-वरळी सागरी सेतूवर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
८ ते ३० जूनदरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (ताडदेव) तीन भरारी पथके आणि पीयूसी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष तपासणी मोहीमराबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘बीएस-४’च्या वायुप्रदूषण मानकांची पूर्तता करणाऱ्या प्रमाणपत्राचीही तपासणी होईल.