पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:49 IST2025-05-22T19:49:47+5:302025-05-22T19:49:55+5:30

Traffic News: गेल्या काही वर्षांत कार खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या संख्येसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या समस्येला लगाम घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारकडून पावलं उचलण्यात येत असून, त्यामुळे कार खरेदी करणाऱ्यांसमोरील अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.

If there is no parking facility, you cannot buy a car, the government is preparing to implement a new rule | पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत

पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत

गेल्या काही वर्षांत कार खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या संख्येसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या समस्येला लगाम घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारकडून पावलं उचलण्यात येत असून, त्यामुळे कार खरेदी करणाऱ्यांसमोरील अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आता कार खरेदी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना कार खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे पार्किंग स्पेस उपलब्ध असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.

महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्ये या नव्या धोरणामुळे मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते. राज्य सरकार पार्किंग स्पेस उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखत आहोत. नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. तसेच विकासकांनीही ग्राहकांना फ्लॅटसोबत पार्किंग उपलब्ध करून दिलं पाहिजे. जर कार खरेदी करणाऱ्याकडे संबंधित पालिकेकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याचं प्रमाणपत्र नसेल तर आम्ही अशा नव्या वाहनाची नोंदणी करणार नाही.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, वाढती लोकसंख्या आणि कारसाठीचं कर्ज सहज उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरी भागात वाहतूक कोंडीचं संकट निर्माण झालं आहे. तसेच रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते, असेही ते म्हणाले.  

Web Title: If there is no parking facility, you cannot buy a car, the government is preparing to implement a new rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.