शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या दोन जागांवर लढण्याचा विचार करेल’, विजय वडेट्टीवार यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:02 IST

Maharashtra Assembly By Election 2026: सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागांवर निवडणूक लढवावी की नाही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागांवर निवडणूक लढवावी की नाही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. तसेच शरद पवार गट तयार नसेल तर काँग्रेस त्या दोन जागांवर पोटनिवडणूक लढण्याचा विचार करेल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत फारसा उत्सुक नसला तरी काँग्रेसने मात्र निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील दोन जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तयार नसेल, तर काँग्रेस पक्ष या जागा लढण्याचा विचार करेल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील दोन विधानसभांमधील पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

याबाबत माहिती देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की,  बारामती विधानसभा मतदारसंघामधील निवडणूक न लढवण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जी भूमिका घेतली त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. ही त्यांची भूमिका असून, याबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही. बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तयार नसेल तर ती निवडणूक लढवण्याबबत काँग्रेस पक्ष विचार करेल, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि भाजपाचे आमदार  शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर राहुरीमध्ये मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र  सहानुभूतीच्या लाटेमुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशा परिस्थितीत काँग्रेस आणि महायुती या दोन मतदारसंघातील निवडणुकीबाबतत काय निर्णय घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2026baramati-acबारामतीrahuri-acराहुरीcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी