शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल तर साहेब विचार करायला हवा', शिवसेना आमदारानं व्यक्त केली खदखद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:24 IST

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केली खदखद

जळगाव- राज्यात उद्धव साहेबांच्या आदेशामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेची फळं चाखता येत आहेत. पण आज शिवसेनेलाच लाचारासारखी वागणूक मिळत आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल तर साहेब विचार करायला हवा, अशी खदखद शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडी धर्माचं पालन केलं जात नसल्याची एक यादीच तानाजी सावंत यांनी यावेळी वाचून दाखवली. 

"शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे. त्याची रग आजमावण्याचा प्रयत्न कुणीच करू नये. पण गेल्या दोन वर्षांपासून सरकारमध्ये जे सुरू आहे ते आम्ही सगळं पाहतो आहे. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळते हे सर्वांनाच माहित आहे. अर्थसंकल्पातूनही तेच सिद्ध झालं आहे. एक साधा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा मुश्रिफांकडे जाऊन दीड कोटींची कामं घेऊन येतो आणि आमच्या छाताडावर नाचतो", असं तानाजी सावंत म्हणाले. 

"आम्ही फक्त आदेशाची वाट पाहातोय""आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करता हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहातोय. आम्ही सहन करणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे. रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात आहे तोपर्यंत आम्ही वाट पाहू. आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. जोपर्यंत साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत", असं तानाजी सावंत म्हणाले. 

"काँग्रेस-राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीचा सदस्य देखील दीड-दोन कोटींची कामं आणतो मग आमच्या शिवसैनिकांनी करायचं काय? त्यांनी एक कोटीचं काम आणायचं आणि ४० लाख कमवायचे आणि शिवसैनिकानं फक्त शिवथाळी भोजन योजना चालवायची? शिवसैनिकांनी शिवथाळी भोजन चालवायचं. १० रुपयाला थाळी विकायचं आणि बिलासाठी तीन-तीन महिने थांबायचं. मग त्याच्यातनं ५ हजारासाठी वाट बघत बसायची हा फरक आहे. शिवसैनिकावरील अन्याय थांबला पाहिजे", असं तानाजी सावंत म्हणाले. 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे