शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:40 IST

Marathwada Flood Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

नागपूर - मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,  अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहेत. पण हा केवळ देखावा आहे. किती मदत देणार सांगावे असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेलं आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवाबनवी सरकार करत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केल्यावर वित्तमंत्री अजित पवार का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू, ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही, ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे. मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर कीड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्यांचं आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे. असं वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपले वेतन द्यावे, असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Government neglecting farmers, pushing them to suicide: Vijay Wadettiwar slams government.

Web Summary : Vijay Wadettiwar criticizes the government for its inaction on farmer loan waivers after heavy losses in Marathwada. He questions the government's priorities, urging immediate aid and demanding increased compensation for crop and land damage. Wadettiwar pledged six months of his salary to the CM relief fund.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रfloodपूरMarathwadaमराठवाडाcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार