शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:26 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणारा जो कायदा आधीच्या सरकारने केला होता तो ‘फूलप्रुफ’ (परिपूर्ण / बिनचूक) असता तर आज इथे येण्याची वेळ कशाला आली असती, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तरे दिली. हा कायदा फूलप्रुफ होता. पण, सध्याच्या सरकारला तो टिकवता आला नाही, या विरोधकांच्या टीकेबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की, त्या फुलप्रुफ कायद्याचे काय झाले ते आज सगळ्यांसमोर आहेच. तसे असते तर आज या ठिकाणी यायची वेळ आमच्यावर आलीच नसती.

मराठा समाज संयम राखेलमराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. याकडे लक्ष वेधले असता ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने आजवर संयमच दाखविला आहे. आपली लढाई राज्य सरकारविरुद्ध नाही, हे त्यांना पटलेले आहे. सरकार आणि सगळेच राजकीय पक्ष त्यांच्यासोबत आहेत तसेच मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत.

राज्यपालांबद्दल आदरचराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी आलेली कटुता आता संपली आहे का, या प्रश्नात ठाकरे म्हणाले की, कटुता, गोडवा असे काही नसते. समोरून जसे बोलले जाते तसे उत्तर आम्ही देतो. राज्यपालांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पुढेही राहील.

...हा दुटप्पीपणा; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा फुलप्रुफ नव्हता! किती हा दुटप्पीपणा’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा स्थगिती देण्यास नकार देते आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते व कायदाही अवैध ठरतो. मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, असा सवालही त्यांनी केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस