शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 12:32 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख जवळ येत आली तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या तरी कुठला पक्ष किती जागा लढवेल, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसकडून १०० जागांवर लढण्यासाठी सुरू असलेल्या तयारीबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसने १०० जागा लढवल्या म्हणून आम्हाला त्रास होण्याचं कारण नाही. जिथे एखादा पक्ष जिंकत असेल, उमेदवार जिंकत असेल तर त्यांनी ती जागा अवश्य लढवली पाहिजे, असं विधान संजय राऊत यांनी केलं. तसेच काँग्रेसच्या खात्यात जाणाऱ्या जागांवर ते उमेदवार जाहीर करत असतील, तर प्रश्न कुठून निर्माण होतो, असेही संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबतची चर्चाही संपल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची संपूर्ण चर्चा पूर्ण झाली आहे. आता कुठल्याही जागेसाठी चर्चा होणार नाही. चर्चा संपली, फाईल क्लोल, असे राऊत यांनी सांगितले.    

दरम्यान, काँग्रेसचे नेते  विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, महाविकास आघाडील सत्तेवर आणण्यासाठी एकेका आमदाराची गरज आहे. या भूमिकेमधून स्वत: राहुल गांधी यांनी लक्ष घातलेलं आहे. आम्ही आता ८७ जागांवरील उमेदवार घोषित केलेले आहेत. तसेच आता आणखी १४ जागा आज संध्याकाळीपर्यंत घोषित होतील.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार