शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू : अटी वाढविल्या, तर ब्रजेशसिंह म्हणतात, परिपत्रकाची अडचण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:50 IST

कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू : अनुदान मिळणारच; कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचारी कर्तव्यावर होता एवढेच बघितले जाईल

खुशालचंद बाहेती।

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे विशेष साहाय्य देण्यासाठी ठरविलेल्या अटींचे १८ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करताना त्या परिपत्रकातील सर्व अटी जशाच्या तशा ठेवल्या आहेत. याशिवाय आयसीएमआर मान्यताप्राप्त हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची नवी अट लादण्यात आली आहे, असे असतानाच कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना विशेष साहाय्य देण्यात येईल. त्यावेळी परिपत्रक बघितले जाणार नाही. ते कर्तव्यावर होते एवढेच बघितले जाईल, इतर अटींना अर्थ नाही, असे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रजेश सिंह यांनी सांगितले आहे.

‘लोकमत’ने २७ सप्टेंबरच्या अंकात पोलीस महासंचालकांच्या १८ सप्टेंबरच्या परिपत्रकातील जाचक अटी व यामुळे पोलिसांतील अस्वस्थतेचे वृत्त दिले होते. या परिपत्रकात ५० लक्ष रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी मृत्यूपूर्वी १४ दिवसांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंध कर्तव्य केल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. यामुळे कंटनमेन्ट झोन, कोरोना रुग्णालय, कोरोना टास्कफोर्स, अशा विशिष्ट ठिकाणच्या कर्तव्यावर नसलेल्या कर्मचाऱ्यांना यासाठी बाद ठरविण्यात आले होते.दि.२८ सप्टेंबर रोजी प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रजेशसिंह यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात १८ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, १८ सप्टेंबरच्या परिपत्रकातील सर्व अटी २८ सप्टेंबरच्या परिपत्रकात जशाच्या तशा आहेत. याशिवाय यात मृत्यूच्या कारणाचे प्रमाणपत्र खाजगी रुग्णालयाचे असेल, तर ते रुग्णालय आयसीएमआरने कोविड-१९ उपचारासाठी मान्यता दिलेले आहे, असे प्रमाणपत्रही मागण्यात आले आहे. आयसीएमआर मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी वेबसाईटवर पाहावी, असेही परिपत्रकात नमूद आहे. मात्र, आयसीएमआर किंवा राज्य पोलिसांच्या वेबसाईटवर अशी यादी उपलब्ध नाही.आयसीएमआर फक्त कोविड-१९ प्रयोगशाळांना परवानगी देते. स्थानिक प्रशासनाने कोविड-१९ रुग्णालय निश्चित केल्यानंतर याची माहिती आयसीएमआरच्या पोर्टलवर टाकली जाते. मात्र, आयसीएमआरकडून लेखी मान्यता अशी येत नाही. अशी मान्यता घ्यावी, असे शासनाचे निर्देश नाहीत.- डॉ. नीता पाडळकर, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, औरंगाबाद मनपाकोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना विशेष साहाय्य देण्यात येणार आहे. कर्तव्यावर असणे वगळता इतर अटी परत घेतल्या आहेत.- ब्रजेश सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस