शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परळीची जागा भाजपने धनंजय मुंडेंसाठी सोडली तर? ती वेळ माझ्यावर येऊ नये एवढीच...; पंकजा मुंडे रोखठोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 07:53 IST

परळीची जागा कोणाला सोडण्याचा विषयच नाही : पंकजा मुंडे लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत बेधडक उत्तरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मला भाजपमध्ये डावलले जात असल्याचा समज लोकांमध्ये आहे; हे जाणीवपूर्वक होत असल्याचेही लोकांना वाटते. तसा समज होऊ नयेे म्हणून मी प्रयत्न करते, तसाच प्रयत्न भाजप पक्षश्रेष्ठी करतील किंवा हा समज बदलण्याचा ते प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे, या शब्दात भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत मन मोकळे केले. 

परळीची जागा भाजपने धनंजय मुंडेंसाठी सोडली तर? मी परळी सोडण्याचा प्रश्न नाही. मला पक्ष विचारेल, ही माझी अपेक्षा आहे. कारण परस्पर निर्णय घेण्याची पक्षाची संस्कृती नाही.

भाजपमध्ये आपल्याला डावलले जात आहे का? वंजारी समाजातील इतरांना पर्याय म्हणून प्रस्थापित केले जात असल्याचे आपल्याला वाटते का? पंकजा मुंडे - मी यावर कधीही भाष्य केलेले नाही. पण, लोकांना तसे वाटते. माझ्या बाबतीत जे झाले ते चांगले झाले नाही, असे केवळ माझ्या समाजातीलच नाही तर अन्य समाजाच्या लोकांनाही वाटते, ते माझ्याशी तसे बोलतात. असा समज आहे, तर तो दुरुस्त करण्याची गरज आहे. मुंडे साहेबांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले हे खरेच आहे. पण, मला त्यांच्या वलयाने काहीही नको आहे. मी पक्षासाठी जे योगदान दिले, त्याचे मूल्यांकन व्हावे, असे लोकांना वाटते. 

भाजपशिवाय दुसरा पर्याय आपण स्वीकारणार आहात का? तशी ऑफर सिरिअसली आली का? मुंडे - या क्षणाला कोणताही नवा प्रयोग करण्याची माझी इच्छा नाही. मध्यंतरीच्या घटनाक्रमानंतर मी स्वत:ला प्रस्थापित करू शकले असते, मंत्रीही होऊ शकले असते. मी यांना भेटले, त्यांना भेटले, या पक्षात जाणार वगैरे बऱ्याच बातम्या दिल्या गेल्या. पण, माझ्या मनाला तसा कोणताही विचार शिवलेला नाही. ती वेळ माझ्यावर येऊ नये, अशी मी प्रार्थना करते. 

प्रदेश भाजप कोअर कमिटीमध्ये आपण आजही आहात का? मुंडे - मी कोअर कमिटीत आहे का? वर्षदीड वर्षात मी जाऊ शकलेले नाही. मध्य प्रदेशची जबाबदारी असल्याने जमले नाही. 

लोकसभेची निवडणूक लढायचा पक्षाने आदेश दिला तर आपली भूमिका काय असेल? धनंजय मुंडे आणि आपण एकत्र येणार का?मुंडे - मी केंद्रात जाण्याची वेळ आली आहे का, हे मी सांगू शकत नाही. दोनवेळा प्रीतम तिथे खासदार आहे, ती चांगले काम करते, तिलाच काय पक्षाच्या स्थापित कोणत्याही नेत्याला डावलून मला काहीही नको आहे. धनंजय आणि माझ्याबाबत सांगायचे तर आम्ही आमचा कौटुंबीक विषय सौम्यतेकडे, सहमतीकडे नेत आहोत. 

भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आपण काय बोलणार?मुंडे - माझे त्या मेळाव्याशी भावनिक नाते आहे. काय बोलायचे ते मी ठरविलेले नाही.

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपा