शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

#VidhanSabha2019 : भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा!

By यदू जोशी | Updated: September 16, 2019 07:41 IST

शिवसेनेला युती नक्कीच करायची आहे आणि युतीदेखील होईल, पण भाजपच्या मनात ऐन वेळी वेगळे काही आले, तर सांगता येत नाही.

- यदू जोशीमुंबई : शिवसेनेला युती नक्कीच करायची आहे आणि युतीदेखील होईल, पण भाजपच्या मनात ऐन वेळी वेगळे काही आले, तर सांगता येत नाही. तशी परिस्थिती आलीच, तर तुम्हीही तयार राहा, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख, तसेच खासदारांच्या बैठकीत केल्याने युतीबाबत सगळेच आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.भाजपकडून शिवसेनेला जास्तीतजास्त १२0 जागा सोडण्यात येतील, अशा बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठकीत यासंबंधीची आपली अस्वस्थता बोलून दाखविली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. खासदार आणि जिल्हाप्रमुख यांच्या वेगवेगळ्या बैठका त्यांनी घेतल्या.युती सन्मानाने होईल. युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ‘फिफ्टी-फिफ्टी’चा असेल, असे त्यांनी यावेळी सांगितल्याने शिवसेना १२0 जागांची भाजपची ऑफर स्वीकारणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते शिवसेनेचे हे दबावतंत्रदेखील असू शकते.युती होणार, होणारच असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले, तरी प्रत्यक्ष जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत युतीमध्ये तणाव असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. आपल्याला यावेळी युती करायची आहे, पण २0१४चा अनुभव चांगला नाही. त्यावेळी भाजपकडूनच युती तोडण्यात आली होती, अशी आठवण उद्धव यांनी या बैठकीत करून दिली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार, विधानसभेच्या जागा आणि मंत्रिपदांबाबतही ‘फिफ्टी-फिफ्टी’ होईल, असे उद्धव यांनी यावेळी सांगितले.>युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा टाकू नकायुती झाली, तर भाजपबरोबरच शिवसेनेतही बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर तर बंडखोरी होणार नाहीच, पण भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरही शिवसेनेकडून बंडखोरी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. आपल्याकडून युतीमध्ये कुठेही मिठाचा खडा टाकला जाता कामा नये, असेही उद्धव यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.>केंद्रीय नेतृत्वाला तोडगा काढावा लागेल? : उद्धव यांनी ज्या पद्धतीने बैठकीत पक्षाचे खासदार, जिल्हाप्रमुखांना युतीबाबत सावध केले. त्यावरून युती सहजासहजी होणार नाही, तोडगा काढण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला उडी घ्यावी लागेल, असेही संकेत मिळाले.>महत्त्वाचा प्रश्नशिवसेना जसे १२0 जागांवर राजी होणार नाही, तसेच भाजप निम्मी मंत्रिपदे शिवसेनेला देण्यास तयार होईल का, असा युतीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण करणारा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.>लोकसभेवेळी युती करताना विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार, विधानसभेच्या जागा व मंत्रिपदांबाबतही 'फिफ्टी-फिफ्टी' होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे कळते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019