शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:49 IST

ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

मुंबई - भाजपासोबतची चर्चा पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच झाली. १५-२० दिवसांत घडामोडी घडल्या. दिल्ली आणि मुंबईतल्या बैठकीत मी सहभागी होतो. सकाळच्या शपथविधीबाबत काळाच्या ओघात उत्तरे मिळतील. हल्ली अनेकजण स्वत:ला फार काही समजण्याच्या नावाखाली अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले चूक झाली असं विधाने करतात. पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले ही मेहरबानी नव्हती. अजितदादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडीचे सरकार ८ दिवसही टिकले नसते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे. सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय आत्ताच घेतला नाही. तर २०१४ पासून पक्ष नेतृत्वाने याची सुरुवात केली होती. २०१४ ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षात संघर्ष नव्हता. भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. २०१६-१७ मध्येही मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला. जवळपास मंत्रिमंडळातील खाती ठरली होती, पालकमंत्रिपदे ठरली. लोकसभेच्या जागांचे वाटपही झाले होते असं तटकरेंनी सांगितले.  

तसेच काही कारणास्तव ती चर्चा पुढे गेली नाही. २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट कौल भाजपा-शिवसेना युतीला मिळाला. १७६ जागांवर युती निवडून आली होती. आघाडीला १०० जागा मिळाल्या होत्या. जनतेचा कौल कुणी, कशाला आणि का नाकारला हे पाहा. त्यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यात देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे काही तासांचे सरकार आले. ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले. त्यात २ पर्यात भाजपा-राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं होतं. एकाचवेळी आमची दोन्हीकडे चर्चा सुरू होती अशी माहिती तटकरेंनी दिली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आमदारांच्या मनात खदखद होती. अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्यच होता असं वाटत होते. तीन पक्षांच्या सरकारऐवजी दोन पक्षाचे सरकार चांगले ठरले असते असं आमदारांच्या मनात होते. ज्यादिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला हेड काऊंटने बहुमत चाचणी घ्या. हा निर्णय आला नसता तर कदाचित वेगळं काही घडले असते. जे घडू शकते याचा विचार करत पक्षनेतृत्वाने अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ती मेहरबानी नव्हती तर पक्षाच्या अस्तित्वासाठी घेतलेली भूमिका होती असं सुनील तटकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाSharad Pawarशरद पवार