शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती छोटी, कामगिरी मोठी : भारताची मान उंचावली आहे चिपळूणच्या सुकन्येने!

By admin | Updated: October 6, 2014 22:32 IST

योगासनमध्ये गौरीची कामगिरी ठरतेय लक्षवेधी

सुभाष कदम - चिपळूणकौलालुंपर (मलेशिया) येथे आठ देशांतर्गत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा मलेशिया योगासन असोसिएशनने आयोजित केली होती. यामध्ये गौरी निनाद डाकवे सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला व भारताची मान जगभरामध्ये उंचावली.  या स्पर्धेत चीन, जपान, श्रीलंका, थायलंड, कोरिया, भारत, इंडोनेशिया या देशांतील खेळाडूंचा समावेश होता. गौरीला योग प्रशिक्षक मंगेश खेडेकर व मधुकर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जिद्द व कोवॅसच्या अध्यक्षा सुमती जांभेकर यांचे सहकार्य लाभले. गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूणची गौरी विद्यार्थिनी असून, डीडी असोसिएटचे निनाद डाकवे व प्रीती डाकवे यांची ती कन्या आहे. चिपळूण कोवॅसच्या व्यायाम शाळेत वयाच्या तिसऱ्या वर्षी गौरी दाखल झाली. वयाच्या चौथ्या वर्षी तिने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक उमेश शेट्ये यांच्या आर्यन स्पोटर्स क्लबने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत तिने पहिल्यांदाच द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तेथेच गौरीच्या योगासनाच्या करिअरला सुरुवात झाली. खूप लहान असल्याने अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तिच्या वयाचा वयोगट नव्हता. तरीसुद्धा केवळ जिद्दीने अनेक स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली. दि. २० डिसेंबर २०११ रोजी वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई महापौर चषकाच्या योगासन स्पर्धा २०११मध्ये ८ वर्षांवरील वयोगटामध्ये सहभागी झाली. परंतु, गौरी सहा वर्षांची असल्याने स्पर्धेमध्ये सहभागीचे प्रमाणपत्र मिळाले बक्षीस नाही. तरीसुद्धा न हरता तिने पुन्हा वेगवेगळ्या स्पर्धांमधून सहभागाची तयारी सुरूच ठेवली. २८ जुलै २०१२ रोजी दिवंगत बाबा लागवणकर खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वयाच्या ६ व्या वर्षी ती सहभागी झाली. यामध्ये तिला यश मिळाले नाही. सिध्दी योग केंद्र, मिरज व कर्नाटक तुळनाड संघ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये ८ ते १४ वर्षांच्या वयोगटात ती सातव्या वर्षी सहभागी झाली. दि. १ मे २०१३ रोजी मुंबई महापौर चषकामध्ये वयाच्या सातव्या वर्षी सहभागी झाली. परंतु, वय कमी असल्याने उत्कृष्ट प्रदर्शन करूनही यश मिळाले नाही. तरीही अपयशाने न खचता पुन्हा जोमाने सरावला सुरुवात केली. प्रशिक्षक मंगेश खेडेकर यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर योगासन चॅम्पियन शीपच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ती सहभागी झाली. ११ मे २०१४च्या राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत दुसरी येऊन ती मलेशियासाठी पात्र ठरली. मुलगा असावा, यासाठी आजही आग्रह धरुन आजही समाजात स्त्री भ्रूणहत्या केली जाते. मुलगीला कमी लेखले जाते. परंतु, परदेशातील या स्पर्धेतही जास्तीत जास्त मेडल मुलींनी पटकावली. मुलांपेक्षा मुली पुढेच आहेत. याचे भान राखून मुलगी वाचवा, असा संदेश गौरीचे वडील निनाद डाकवे यांनी दिला. देशाची मान उंचावली.वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मलेशियात जाऊ शकली गौरी.योगासनामध्ये अलौकिक कामगिरी करणार.जिद्दीने सहभागी झाली अनेक स्पर्धांमध्ये गौरी.अनेक स्पर्धा गाजवल्या.