Idea Vodafone's VI network gone in half of the states, including Mumbai, Pune; Customer complaints | मुंबई, पुण्यासह अर्ध्या राज्यातील आयडिया व्होडाफोनचे नेटवर्क गुल; सकाळपासून ग्राहक त्रस्त

मुंबई, पुण्यासह अर्ध्या राज्यातील आयडिया व्होडाफोनचे नेटवर्क गुल; सकाळपासून ग्राहक त्रस्त

मुंबई- पुण्यातील काही भागांत आयडिया- व्होडाफोनच्या ग्राहकांना आज सकाळपासून नेटवर्क नसल्याच्य़ा समस्येला सामोरे जावे लागले. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. 


मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच सकाळपासून नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना अर्ध्या तासापूर्वी रेंज आली आहे. मात्र, त्यामध्ये इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले. 


पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. मात्र, आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे. 


पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे. 


परिक्षार्थिंची मोठी अडचण
सध्या राजभरातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहेत. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी व्होडाफोन मिनी स्टोअर समोर लोकांची गर्दी झाली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Idea Vodafone's VI network gone in half of the states, including Mumbai, Pune; Customer complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.