शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 1:24 AM

कायदा प्रभावी करण्याचा उद्देश; नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंड

नवी दिल्ली : तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा सरकार विचार करीत आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिक भक्कम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तंबाखू नियंत्रणासाठी कायद्यात काय दुरुस्ती कराव्यात, याबाबत शिफारस करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक कायदा उपसमिती नेमली होती. या समितीने शिफारशींसह आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सादर केला आहे.तंबाखू सेवनासाठी कायदेशीर वय वाढविण्यासोबत नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढविण्याची शिफारस या समितीने केली आहे. यासोबतच सिगारेट आणि तंबाखूयुक्त पदार्थांच्या अवैध व्यापारावर निगराणीची आणि त्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याचे समितीने सुचविले आहे. यातहत उत्पादनाच्या ठिकाणी निगराणी ठेवून तंबाखूजन्य उत्पादनांवर बार कोड लावला जाईल. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना उत्पादन वैध आहे का? त्यावरील देय कर चुकता आलेला आहे काय? हे निश्चित करण्यात मदत होईल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात धूम्रपान केल्यास दंड वाढविण्याचाही विचार आहे. सध्या दोनशे रुपये दंड आहे.जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार (जीएटीएस-२) तंबाखू सेवनाचे सुरुवातीचे सरकारी वय १७.९ वर्षांवून १८.९ वर्षे करण्यात आले आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात असताना बव्हंशी लोक तरुणपणात धूम्रपानाकडे वळतात. १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुण मुले मित्रांचा दबाव किंवा प्रचलन म्हणून धूम्रपान करतात. कायदेशीर वय २१ वर्षे केल्यास तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वा धूम्रपान करणाºया युवकांच्या संख्येत दरवर्षी कमालीची घट होईल. एवढेच नव्हे, तर आई-वडिलांनाही २१ वर्षे वयाखालील मुलांना दुकानात तंबाखूजन्य पदार्थ खरेदीसाठी पाठवू शकणार नाहीत, असे एका अधिकाºयाने सांगितले. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायद्यातहत सार्वजिक ठिकाणी धूम्रपानास मनाई आहे. शैक्षणिक संस्थेच्या शंभर मीटर परिसरात सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थ १८ वर्षांखालील मुलांना विकण्यास मनाई आहे.विधेयकात पुन्हा दुरुस्तीआरोग्य मंत्रालयाने २००३ च्या विधेयकात अनेक दुरुस्ती प्रस्तावित करून सिगारेट आण अन्य तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य नियमन, उत्पादन, पुरवठा-वितरण ) दुरुस्ती विधेयकाचा मसुदा २०१५ मध्ये जारी केला होता. तथापि, २०१७ मध्ये मसुद्यातील तरतुदींबाबत फेरविचार करण्यासाठी हा मसुदा मागे घेण्यात आला होता. आता आरोग्य मंत्रालयाने पुन्हा विधेयकात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.