कृषी क्षेत्रात आयडीबीआयचे योगदान

By Admin | Updated: December 23, 2014 02:18 IST2014-12-23T02:18:16+5:302014-12-23T02:18:16+5:30

शेतक-यांना आर्थिक साहाय्य त्वरित देता यावे, यासाठी आवेदनपत्र व कर्जाची पूर्व प्रक्रिया सोपी आणि साधी केलेली आहे.

IDBI's contribution to agriculture sector | कृषी क्षेत्रात आयडीबीआयचे योगदान

कृषी क्षेत्रात आयडीबीआयचे योगदान

आयडीबीआय बँक गेली ५० वर्षे देशाच्या विकासात मोलाचा हातभार लावत आहे आणि मागील १० वर्षे शेतकरीवर्ग व कृषी क्षेत्र यांच्या विकासासाठी कार्यरत आहे. शेतकऱ्यांना मित्रत्वाचा हात देऊन त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या या बँकेने भारताच्या कृषी विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. या अनुषंगाने बँक नेहमीच नवनवीन कृषी आधारित योजना बँकेच्या सर्व शाखांतून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. शेतक-यांना आर्थिक साहाय्य त्वरित देता यावे, यासाठी आवेदनपत्र व कर्जाची पूर्व प्रक्रिया सोपी आणि साधी केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी साक्षरता वर्ग, कृषीविषयक तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन करणारे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. कृषी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या मदतीने शेतीविषयक नवीन घडामोडींची माहिती दिली जाते. नवीन सोयी, नवीन उपकरणे याबद्दल जागृती निर्माण करण्यात येत आहे. आयडीबीआय बँक राबवीत असलेल्या ‘आरएसईटीआय’ या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्येही कृषी व तत्सम व्यवसायासाठी प्रक्षिक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना आवश्यक ते आर्थिक साहाय्य देऊन बँकेने नेहमीच गावाच्या आणि शेतीच्या प्रगतीवर भर दिला आहे.
किसान क्रेडिट कार्ड (यात ५०,००० रु. अपघात विमा मिळतो आणि प्रीमियम पूर्णपणे बँक भरते) ां१े ेीूँंल्ल्र२ं३्रङ्मल्ल ’ङ्मंल्ल’ (ट्रॅक्टर लोन, कृषी अवजारांसाठी कर्ज इ.) कुक्कुटपालन, डेअरी कर्ज इ. सिंचनासाठी ऋण, शेतीजागा विकासासाठी कर्ज या वेगवेगळ्या सुविधा बँकेने उपलब्ध केल्या आहेत. बँकेचे अधिकारी नेहमीच नवीन कृषी संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात तत्पर असतात, जेणेकरून योजनांपैकी एक म्हणजेच ऋ्रल्लंल्लूी अ‍ँ्रल्ल२३ ६ं१ीँङ्म४२ी १ीूी्रस्र३२’ शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकरी आपला उत्पादित माल या गोदामात सुरक्षित ठेवू शकतो. चांगली बियाणे, खते घेण्यासाठी कर्ज, स्वर्ण तारण कर्ज, ँ१्र-ू’्रल्ल्रू’ आणि शेती व्यवसाय केंद्रासाठी कर्ज या आणि अशा अनेक योजना बँक राबवत आहे. कऊइक ङ्र२ंल्ल ळं३‘ं’’ ही योजना त्यापैकीच एक. वेळेत/ त्वरित कर्जवाटप, कर्जसाहाय्य देण्यासाठी बँक नेहमीच आघाडीवर आहे. शेतकरी वर्गाबरोबरच छोट्या वित्तीय संस्थांना, संघटनांना (ढअउर- ढ१्रें१८ अ‍ॅ१्रू४’३४१ं’ उङ्म-डस्र. रङ्मू्री३्री२) योग्य ते मार्गदर्शन व कर्जसाहाय्य बँक देते. शेतकरी संस्थांना बँकेने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या सर्व शेतीविषयक योजनांचा भाग म्हणून बँक वेगवेगळ्या ठिकाणी शेती प्रदर्शन व शेतीविषयक मेळावे आयोजित करीत आलेली आहे. शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित ‘प्रॉडक्ट्स’ उपलब्ध करून देण्यासाठी आयडीबीआय बँक नेहमीच बांधील, कटिबद्ध आहे. ‘शेतकरी प्रगत तर भारत प्रगत’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात बँक नेहमीच अग्रेसर आहे. शेतीविषयक ‘हायटेक अ‍ॅग्री सेल’ बँकेने नुकताच स्थापन केला आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी कंपनी, शेतकरी वर्ग यांना मार्गदर्शन करणे, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर हे या अ‍ॅग्री सेलचे उद्दिष्ट आहे. शेती आरोग्य आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आरोग्य हे बँकेचे ध्येय आहे.

Web Title: IDBI's contribution to agriculture sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.