महाराष्ट्रातील या 10 लॅबलाच मिळालीये कोरोना टेस्टची परवानगी, अशी आहे देशाची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 07:20 PM2020-03-26T19:20:24+5:302020-03-26T19:59:11+5:30

इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना तपासणीसाठी देशातील काही प्रायव्हेट लॅबला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी संपूर्ण देशभरात 15,500 कलेक्शन सेंटर तयार झाले आहेत.

Icmr gave permission to some privet labs in india for the coronavirus test sna | महाराष्ट्रातील या 10 लॅबलाच मिळालीये कोरोना टेस्टची परवानगी, अशी आहे देशाची यादी

महाराष्ट्रातील या 10 लॅबलाच मिळालीये कोरोना टेस्टची परवानगी, अशी आहे देशाची यादी

Next
ठळक मुद्देकोरोना तपासणीसाठी देशातील 22 प्रायव्हेट लॅबला मिळालीये आयसीएमआरची मंजुरी कोरोनाच्या तपासणीसाठी संपूर्ण देशभरात 15,500 कलेक्शन सेंटर महाराष्ट्रात 10 लॅब करतील कोरोनाची तपासणी

मुंबई - चीनच्या वुहान शहरापासून थैमान घालत निघालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक मातब्बरदेश या घातक व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना तपासणीसाठी देशातील काही प्रायव्हेट लॅबला मंजुरी दिली आहे. 

कोरोनाच्या तपासणीसाठी संपूर्ण देशभरात 15,500 कलेक्शन सेंटर तयार झाले आहेत. एवढेच नाही, तर आयसीएमआरने कोरोना तपासणीसाठी निश्चित केलेली फीस ही जगातील कोरोना तपासणीची सर्वात कमी फीस आहे.

आयसीएमआरने निश्चित केल्यानुसार, खासगी लॅबला कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 4,500 रुपयांहून अधिक किंमत घेता येणार नाही. या तपासणीत स्क्रीनिंगसाठी 1500 रुपये आणि  कंफर्मेशन टेस्टसाठी 3,000 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारी लॅबमध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी तपासणी मोफत केली जाणार आहे.

अशा आहे सरकारी आणि खासगी लॅबची यादी -

मराहाष्ट्र - 
खासगी लॅब - 

  • InfeXn लॅबोरेटरी, ए/131, थेरलेस कम्पाउंड, रोड नंबर 23, वागळे इंडस्ट्रियल स्टेट, ठाणे (पश्चिम).
  • थायरोकेयर टेक्नॉलॉजीस लिमिटेड, डी 37/1, टीटीसी एमआयडीसी, नवी मुंबई.
  • सर एचएन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मॉलिक्युलर मेडिसायंस, रिलायंस लाइफ सायंसेस, आर-282, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, राबेल, नवी मुंबई.
  • सबरबन डायग्नोस्टिक, 306-307, तिसरा मजला, कॉमर्शियल बिल्डिंग-1, कोहिनूर मॉल, मुंबई.
  • एजी डायग्नोस्टिक, नयनतारा बिल्डिंग, पुणे.
  • एसआरएल लिमिटेड, प्राइम स्क्वैअर बिल्डिंग, प्लॉट नंबर 1, गायवाड़ी इंडस्ट्रियल स्टेट, एसव्ही रोड, गोरेगाव, मुंबई.
  • कोकिलाबेन धिरूभाई अंबाई हॉस्पिटल लॅबोरेटरी, फोर बंगलो, मुंबई.
  • आय-जेनेटिक डायग्नोस्टिक, क्रिस्लन हाऊस, अंधेरी ईस्ट, मुंबई.

सरकारी लॅब

  • संक्रमक आजारांसाठी कस्तुरबा रुग्णालय - मुंबई.
  • इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज- नागपूर.


दिल्ली -
खासगी लॅब -

  • डॉ. डँग लॅब, सी-2/1 सफदरजंग डेव्हलपमेंट एरिया, नवी दिल्ली.
  • मॅक्स लॅब, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, नवी दिल्ली.
  • लाल पॅथ लॅब, ब्लॉक-ई, सेक्टर 18,रोहिणी, नवी दिल्ली.
  • लॅबोरेटरी सर्व्हिसेस, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, सरिता विहार, नवी दिल्ली.

दिल्लीतील सरकारी लॅब -

  • राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र.
  • दिल्ली एम्स.

 

गुजरात -
खासगी लॅब -

  • एसएन जेनलॅब प्रा. लिमिटेड, प्रेसिडेंट प्लाझा-ए, महावीर हॉस्पिटलजवळ, सूरत
  • सुपराटेक मायक्रोपॅथ लॅबोरेटरी अँड रिसर्च इंस्टिट्यूट प्रा. लि., केदार, अहमदाबाद
  • यूनिपाथ स्पेशालिटी लॅबोरेटरी लिमिटेड, 102 सनोमा प्लाटा, एलिसब्रिज, अहमदाबाद

सरकारी लॅब -

  • एम पी शाह गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज- जामनगर
  • बीजे मेडिकल कॉलेज - अहमदाबाद


हरियाणा
खासगी लॅब

  • मॉडर्न डाग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर लॅब, 363-364, जवाहर नगर, गुरुग्राम
  • एसआरएल लिमिटेड, जीपी 26, सेक्टर 18, गुरुग्राम
  • स्ट्रँड लाइफ सायंसेस, ए-17, सेक्टर 34, गुरुग्राम

खासगी लॅब -

  • BPS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज- सोनीपत
  • पं. बी. डी. शर्मा पोस्ट ग्रेजुएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस - रोहतक

 

कर्नाटक 
खासगी लॅब -

  • केंसाइट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, श्री शंकरा रिसर्च सेंटर, बेंगळुरू
  • न्यूबर्ग आनंद रेफरंस लॅबोरेटरी, आनंद टावर, 54 बाउरिंग हॉस्पिटल रोड, बेंगळुरू

 

कर्नाटकातील सरकारी लॅब -

  • शिमोगा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस - शिवमोगा
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी फिल्ड यूनिट - बेंगळुरू
  • बेंगलोर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इंस्टिट्यूट- बेंगळुरू
  • हसन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस - हासन
  • म्हैसूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इंस्टिट्यूट- म्हैसूर

 

तेलंगणा -
खासगी लॅब -

  • अपोलो हेल्थ अँड लाईफस्टाईल लिमिटेड , डायग्नोस्टिक लॅबोरेटरी, बोवनपल्ली, सिकंदराबाद
  • विमता लॅब लिमिटेड, प्लॉट नंबर 142, फेज 2, आयडीए चेरलापेल्ली, हैदराबाद
  • विजया डायग्नोस्टिक सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, स्ट्रिट नंबर 19, हिमायत नगर, हैदराबाद
  • लॅबोरेटरी सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पिटल्स, सहावा मजला, हेल्थ स्ट्रिट बिल्डिंग, जुबली हिल्स, हैदराबाद

सरकारी लॅब -

  • गांधी मेडिकल कॉलेज - सिकंदराबाद

 

तामिळनाडू -
खासगी लॅब -

  • न्यूबर्ग लॅब प्रायव्हेट लिमिटेड, 46-48 मासिलमणी रोड, बालाजी नगर, चेन्नई
  • डिपार्टमेंट ऑफ लॅबोरेटरी सर्व्हिसेस, अपोलो हॉस्पिटल्स इंटरप्राईज लिमिटेड, चेन्नई
  • डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल व्हायरॉलॉजी, वैल्लोर

सरकारी लॅब -

  • गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज- थेनी
  • किंग्स इंस्टीट्यूट ऑफ प्रिवेंटिव मेडिसिन अँड रिसर्च - चेन्नई.

Web Title: Icmr gave permission to some privet labs in india for the coronavirus test sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.