शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

पिस्तुल दाखवले मुळशीत अन् २५० किमीवरील खेडकरांचे गाववाले करतायत हल्ल्याच्या प्रयत्नाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 08:48 IST

Manorama Khedkar NEWS: घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीमुळे अख्खे खेडकर कुटुंबाचे कारनामे जगजाहीर होऊ लागले आहेत. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्यावर आता पोलीस कारवाई बाकी आहे. पुण्यातील मुळशीमध्ये मनोरमा यांनी शेतकऱ्यांवर पिस्तुल उगारून त्यांना दमदाटी केली होती. जमीन हडप करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला असून मनोरमा यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे असताना घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

मनोरमा खेडकर यांचे अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये भालगाव नावाचे मूळ गाव आहे. या गावाने मनोरमा यांच्या पिस्तुल दाखवत दमदाटी केल्या प्रकरणावर मनोरमा यांना पाठिंबा दिला आहे. यासाठी त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी व पोलिसांना निवेदन दिले आहे. यामध्ये 5 जून 2023 रोजी दुपारी मुळशी परिसरातील काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी काठ्या, धारदार हत्यार घेऊन मनोरमा खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. 20 मिनिटे हा राडा सुरु होता. तेव्हा आपला जीव वाचविण्यासाठी मनोरमा यांनी पिस्तुल काढल्याचे या गावकऱ्यांनी म्हटले आहे. मनोरमा या आमच्या गावच्या सरपंच होत्या तेव्हा त्यांनी गावाचा कायपालट केल्याचेही हे गावकरी समर्थनार्थ सांगत आहेत. 

तसेच मुळशी प्रकरणी एकच बाजू दाखवण्यात येत असून खरी बाजू लपविली जात आहे. खेडकरांची नाहक बदनामी सुरु आहे. खेडकरांनी पिस्तुल काढले तेव्हा जमाव बाजुला झाल्याचा दावा या गावकऱ्यांनी केला आहे. तसेच बदनामी थांबविली नाही तर मुंबईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी गावाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणत आहेत.

आता पर्यंत खेडकरांचे काय काय प्रकार समोर आले? 

खरेतर मुळशीपासून खेडकरांचे अहमदनगरला असलेले गाव हे सुमारे २५० किमी दूर आहे. पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पिस्तूलचे लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. हे लायसन रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटी, बनावट कागदपत्रे देऊन आयएएस नोकरी हडपलेली आहे. एसीबीने दिलीप खेडकर यांच्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. यात आता आयकर विभागानेही लक्ष घातले असून ते देखील चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांच्यावर प्रशिक्षण रद्दची कारवाई करण्यात आली आहे. या आठवडाभरात त्यांना मसुरीला हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. यातच मनोरमा यांचा पोलिसांशी मेट्रोच्या कामावरून हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने मनोरमा यांच्या बाणेरच्या बंगल्याच्या समोरील फुटपाथवरील अतिक्रमण तोडले आहे. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरCrime Newsगुन्हेगारीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणेPoliceपोलिस