शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Khadse : नाव घेऊन सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मला त्रास झाला; खडसेंचा थेट हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 16:16 IST

Eknath Khadse attack on Devendra Fadnavis: "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देलोक म्हणतात की, नाथाभाऊचं काही अडकलं असेल म्हणून ते पक्षात अन्याय होऊनही पक्ष सोडत नाहीअसं काही नाही. माझा जीव पक्षावर जडला आहे. म्हणून सहन करतोयहा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही

जळगाव - भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी पुन्हा एकदा पक्षावर जोरदार टीका केली आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे सांगत एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो, असा थेट आरोपही खडसे यांनी केला.एकनाथ खडसे यांच्यावरील "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांनी पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.खडसे म्हणाले, ''माझ्यावर अन्याय झाला आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार. मुखमंत्री तेव्हा अंजली दमानिया यांना वेळ देत भेटत होते. पण खडसें याना भेटत नव्हते. पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. आमचे मुख्यमंत्री  ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही,'' असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.''मी नाराज आहे. आता लोक म्हणतात की, नाथाभाऊचं काही अडकलं असेल म्हणून ते पक्षात अन्याय होऊनही पक्ष सोडत नाही. पण असं काही नाही. माझा जीव पक्षावर जडला आहे. म्हणून सहन करतोय. पर्याय भरपूर आहेत.मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये धमक असते. ती धमक माझ्यात तुम्ही निर्माण केली. तीच माझी शक्ती आहे, ''असे खडसे यांनी सांगितले.''उत्तर महाराष्ट्राचे नशीब असे की, भाऊसाहेब हिरे, रोहिदासदा, मधुकरराव चौधरी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आली होती. पण त्यांना संपविण्याचे प्रयत्न झाले. तसेच माझ्या सोबत झाले, असा दावा खडसे यांनी केला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र खान्देशला कधीच संधी मिळाली नाही,'' अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाJalgaonजळगावPoliticsराजकारण