शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 21:00 IST

....यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली.

राज्यातील मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि इतरही काही भागांत सलग झालेल्या पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खांदेश दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे, आश्वासनही दिले. यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली.

गुलाबराव पाटील म्हणाले, यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. आमदारांनीही त्यांच्या मतदारसंघातील विषय मांडले. आम्ही त्यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती दिली आहे. कशा पद्धतीने नुकसान झाले आहे आणि कशा पद्धतीची मदत मिळावी, अशा पद्धतीने लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यावर, मुख्यमंत्र्यांनीही जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे."

जळगाव जिल्ह्यासंदर्भात बोलताना, जिल्ह्यातील 35 मंडळे तर 65 मीलीमीटरच्या वर आले आहेत. इतर जे आहेत, ते निकश बघून ज्या ठिकाणी पिकाचे नुकसान अधिक दिसत आहे, तेथे पाण्याचा निकष न लावता पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

यावेळी, उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, मुख्यमंत्र्यांना हात  जोडून विनंती आहे की, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, असे विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले, "आमची  त्यांना हात जोडून विनंती आहे की, यात राजकारण करू नये."  

काय म्हणाले होते ठाकरे? -दरम्यान, सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्त केले पाहिजे. त्याचबरोबर ज्या प्रमाणे पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये, कालबद्ध कार्यक्रम करून जाहीर केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारने हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी. मी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ जाहीर करून कालबद्ध पद्धतीने त्याचे वाटप करा. बँकाच्या शेतकऱ्यांना जात असलेल्या नोटिसा थांबवा.

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शासनातर्फे निकषात न अडकता जास्तीत जास्त मदत देण्यात येईल व शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. 

यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील आणि आमदार अमोल जावळे उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Plea to Thackeray: Don't Politicize Farmers' Issues, Says Gulabrao Patil

Web Summary : Amidst farmer distress due to heavy rains, Minister Gulabrao Patil urges Uddhav Thackeray to avoid politicizing the issue of comprehensive loan waivers. Chief Minister Fadnavis assured maximum assistance to affected farmers during his Khandesh tour, addressing their concerns and assessing the extensive crop damage.
टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRainपाऊसFarmerशेतकरी