शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

"दोन्ही हात वर करून सांगतो..."; रितेश देशमुख यांचे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना एका वाक्यात उत्तर

By संतोष कनमुसे | Updated: January 6, 2026 11:13 IST

राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. काल लातूरमध्ये भाजपाची सभा झाली, यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत मोठे विधान केले.

राज्यात २९ महापालिकांची निवडणूक सुरू आहे. मतदान ९ दिवसांवर येऊन ठेपली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, राज्यभरात प्रचार सभा सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल (सोमवारी) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत मोठे विधान केले. "लातुरमधील विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील", असे विधान केले. या विधानामुळे आता राज्यात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्यांनी या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, आता अभिनेता रितेश देशमुख यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली. 

निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...अभिनेता रितेश देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी कुठेही चव्हाण यांचे नाव न घेता टोला लगावला. 

"दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नाव मनावर कोरलेले असतात. लिहिलेले पुसता येतं कोरलेलं नाही, जय महाराष्ट्र", असे रितेश देशमुख यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आठवणी लिहित, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान काय होते?

लातूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. काल भाजपाची बैठक होती, या बैठकीत भाषणावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक विधान केले आहे. "सर्वांनी दोन्ही हात ऊंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतेय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही” असे विधान चव्हाण यांनी केले. या विधानाची राज्यात सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh slams BJP leader's remark on Vilasrao Deshmukh.

Web Summary : Actor Riteish Deshmukh responded to BJP leader Ravindra Chavan's controversial statement about erasing Vilasrao Deshmukh's memory. Deshmukh emphasized that people remember leaders who lived for them, their names etched in hearts, not just written in books.
टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखcongressकाँग्रेसBJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाण