मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट जमा केला, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 04:32 PM2021-01-07T16:32:23+5:302021-01-07T16:58:22+5:30

Vijay wadettiwar: मितेश भांगडीया यांच्या याचिकेमुळे दणका

I personally went to the ED office and collected my passport, Vijay wadettiwar's reaction | मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट जमा केला, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया 

मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट जमा केला, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया 

googlenewsNext
ठळक मुद्देभांगडिया हायकोर्टात गेले. त्यावेळी हायकोर्टाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा ठपका लावण्यात आला आहे. भाजपाचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी याबाबत तक्रार केली होती. त्याचाच विजय वडेट्टीवार दणका बसला आहे. 

आजच्या तारखेच्या माझ्यावर कुठलीही केस नाही. २०१२ मध्ये शिक्षणासंबंधी चार किरकोळ प्रकारच्या केसेस होत्या. मी ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट स्वत: जमा केला. मी स्वतः व्हेरिफिकेशन करायला सांगितले. मी ओबीसीसाठी काम करीत आह, माझ्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी येणार आहे, त्यामुळे मी पुढे जाऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. - विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री

भांगडिया यांनी केलेल्या याचिकेत विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या गुन्हे लपवल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. त्यावर कारवाई झाली नाही म्हणून ते शेवटी हायकोर्टात गेले. अधिक माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता (पर्मनंट ऍड्रेस) दिला होता. तेथील पोलीस ठाण्यामधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत असे नमूद होते. त्यामुळे  भांगडिया हायकोर्टात गेले. त्यावेळी हायकोर्टाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.

 

Read in English

Web Title: I personally went to the ED office and collected my passport, Vijay wadettiwar's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.