शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती, पण...", जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:54 IST

Phule Movie controversy: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. या वादात उडी घेत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला खडेबोल सुनावले आहेत.

Phule Movie Jayant patil News: अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुले चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही आक्षेप घेण्यात आले. त्यातच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद उभा राहिला. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. 

वाचा >>'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय?

सेन्सॉर बोर्डाकडून सूचवण्यात आलेल्या बदलांच्या पत्राची प्रत शेअर करत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाच्या मानसिकेतेवर बोट ठेवलं आहे. 

'त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते'

जयंत पाटलांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या प्रोपगंडावर आधारित (propoganda based) फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र 'फुले'सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे."

"नामदेव ढसाळ कोण? (Who is Namdeo Dhasal?) असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता 'फुले' चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते", अशा शब्दात जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला.

फुले चित्रपटातील काही संवाद, काही दृश्ये सेन्सॉर बोर्डाने बदलण्यास सांगितली आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून पर्यायी शब्दही देण्यात आले आहेत. त्यामुळे हा मुद्दा आता तापल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, त्याची तारीख बदलण्यात आली असून, आता २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेbollywoodबॉलिवूडNCPराष्ट्रवादी काँग्रेस