शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:58 IST

Eknath Shinde Clarification on Jai Gujarat Statement: पुण्यातील कार्यक्रमात शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेनंतर प्रचंड टीका झाली

Eknath Shinde Clarification on Jai Gujarat Statement: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले. त्यातच मराठीत न बोलल्याने काहींना मारहाण करण्याचेही प्रकार घडले. प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे विधानही केले. त्याच दरम्यान आज पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात म्हणाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यावर आता शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"पुण्यात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या गुजराती बांधवांनी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. त्यात सर्वसामान्य लोकांना विविध सोयी आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे आज लोकार्पण झाले. मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र तर म्हणतच असतो, जय हिंद हा देशाचा अभिमान तर जय महाराष्ट्र हा राज्याचा अभिमान. त्यासोबत मी शेवटी जय गुजरात म्हणालो, कारण समोरची सगळी लोकं गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली. तिथे जो प्रकल्प उभा राहिला आहे, तो सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी तसे म्हणालो," असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले.

"माझ्या या वक्तव्यानंतर जे लोक टीका करण्याचे काम करत आहे, त्या लोकांबद्दल मी जास्त काही भाष्य करू इच्छित नाही. पण मी एवढेच सांगेन की जिनके घर शिशे के होते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही मारा करते..." असा सणसणीत टोला शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला. त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा जय गुजरात अशी घोषणा देतानाचा व्हिडीओ दाखवला. तसेच, उबाठाच्या अधिकृत पेजवरील गुजराथी भाषेतले पत्र दाखवले. त्याचसोबत आदित्य ठाकरे यांचे 'केम छो वरळी' हे पोस्टरही दाखवले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGujaratगुजरातUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे