मी 'कलम 370' वर मतदान केलेच नाही; सुप्रिया सुळेंचे प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 09:53 PM2019-09-01T21:53:17+5:302019-09-01T21:57:32+5:30

सुप्रिया सुळे यांनी कलम 370 विरोधात मतदान केल्याचा आरोप भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.

I didnt vote on 'Section 370' in loksabha; Reply to Supriya Sule to amit shah | मी 'कलम 370' वर मतदान केलेच नाही; सुप्रिया सुळेंचे प्रत्यूत्तर

मी 'कलम 370' वर मतदान केलेच नाही; सुप्रिया सुळेंचे प्रत्यूत्तर

Next

पुणे : लोकसभेत जेव्हा कलम 370 वर मतदान घेतले गेले तेव्हा सुप्रिया सुळे यांनी कलम 370 विरोधात मतदान केल्याचा आरोप भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला. यावर सुप्रिया सुळे यांनी अमित शहा धादांत खोटे बोलत आहेत, मी कलम 370 मतदान प्रक्रियेत मतदानच केलेले नसल्याचे स्पष्ट केले. 


आज सोलापूरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्य़ाचा समारोप करण्यात आला. यावेळी अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द करण्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. याचवेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केला. 


सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत कलम 370 वर मतदान प्रक्रियेत विरोधात मतदान केल्याचा आरोप केला. तसेच सोलापूरकरांना याचा जाब विचारण्याचेही आवाहन केले. यावर सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझावर त्यांची बाजू मांडली. 


कलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर आपण आपली भुमिका मांडली होती. यावेळी शहांना ज्यांच्या बाबत आपण निर्णय घेतोय त्यांचे म्हणजेच काश्मीरच्या जनतेचे मत घेऊया, असे आवाहन केले होते. मात्र, या चर्चेमधून काहीच निष्पन्न न झाल्याने आपण सदनातून बाहेर पडले, मतदानावर बहिष्कार घातला. अमित शहा यांनी केलेला आरोप अत्यंत खोटारडा आहे. लोकसभेच्या रेकॉर्डवर याची नोंद आहे. मी मतदानच केले नसल्याचा खुलासा सुळे यांनी केला. 

दरम्यान, अमित शहा यांनी शरद पवार यांचे नाव घेत अजित पवारांवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीची खिल्ली उडविली. जर काँग्रेस, दरवाजा उघडला तर आता केवळ पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारच दिसतील. कारण बाकीचे आमच्या बाजुला आले आहेत, अशी टीका केली. 

शरद पवार यांचे लाडके अजित पवार यांनी 74 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला. हजारो कोटींचा निधी दिला पण एक थेंब पाणी मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र मागे पडला. मात्र देवेंद्र फडणीस यांनी मागील पाच वर्षात विकास कामे करून महाराष्ट्र नंबर वन बनवला. हा काळ सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल. काँग्रेस मधील गांधी घराणे हे राजकारणाला घरचा ठेका समजतात, अशी टीका अमित शहा यांनी केली. 

 

Web Title: I didnt vote on 'Section 370' in loksabha; Reply to Supriya Sule to amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.