शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:31 IST

"मला त्यासंदर्भात काहीही माहीत नाही. मला ते जाणवलेही नाही..."

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र यातच, महायुतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील ऑपरेशन लोटस मुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. यासंदर्भात विचारले असता, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमत्री अजित पवार यांनी, 'नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही. प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो,' असे म्हणत  प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैटकिला आले नाही? असे विचारले असता अजित दादा म्हणाले, "मला त्यासंदर्भात काहीही माहीत नाही. मला ते जाणवलेही नाही. कारण आम्ही, मी, एकनाथ राव, देवेंद्रजी आणि सीएस असे बसतो. मला असे वाटले, कारण आमचेही मक्रम आबा पाटील नव्हते, दत्ता मामा भरणे नव्हते, मुश्रीफ साहेबही लवकर निघून गेले. कारण त्यांना जायचे होते. तर माझा असा असमज झाला की, आज छाननी आहे, २८८ नगर पालिका आणि नगर पंचायतींची आणि त्या छाननी मुळे संख्या रोडावली की काय असा माझा अंदाज होता. पण नंतर मी त्या मिटिंगमधून इकडे निघून आलो. नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला विचारलं असं काही झालंय का? पण मला खरो खरच असं काही जाणवलं नाही. नाही तर मी लगेच एकनाथरावांना  विचारले असते. पण मी त्या अँगलने कधी बघितलेही नाही. कारण प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असता त्या प्रमाणे आम्ही बसलेलो होतो."

"प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो" -मित्र पक्षांकडून एकमेकांकडे घेतलेल्या नगरसेवकांवरून नाराजी नाट्य रंगले आहे, विशेषतः शिवेसेनेच्या? असा प्रश्न केला असता, अजित दादा म्हणाले, "प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि निवडणुकीच्या कालात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. तिकिटे देण्याच्या निमित्ताने वाढते. अध्यक्षपदाची उमेदवारी देणण्याच्या निमित्ताने वाढते आणि त्यातून आज मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे, बाकीचे सहकारी, बसले होते, असे मला नंतर समजले. कारण तेव्हा मी तेथे नव्हतो. पण त्यासंदर्भात काही तरी बैठक झाली, असे माझ्या कानावर आले."

महत्वाचे म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट होत असते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला, उपमुख्यमंत्री शिंदे वगळता त्यांचे सर्व मंत्री अनुपस्थित होते. विशेष म्हणजे, कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन, त्यांची भेट घेतली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Didn't notice ministers' displeasure: Ajit Pawar on Shinde group's protest.

Web Summary : Ajit Pawar claims ignorance of Shinde faction's ministers' boycott due to local election disagreements. He emphasized that parties try to strengthen themselves during elections. Shinde's ministers met Fadnavis later.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे