शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 15:07 IST

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Congress MLA ( Marathi News ) : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच नाचक्की झाली. या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल आठ मते फुटल्याची चर्चा रंगत आहे. यामध्ये माजी काँग्रेस नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असलेले आमदार आणि इतर काही आमदारांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव या यादीत घेतलं जाऊ लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून माझी बदनामी थांबवा असं आवाहन केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर म्हणाले की, "माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची बदनामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष हायकमांडने थांबवली पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी मतदान चेक करा. मी फुटलो, असं जे सांगितलंय जातंय ते पक्षाने आणि प्रसारमाध्यमांनी थांबवलं पाहिजे," असं आवाहन खोसकर यांनी केलं आहे.

नाना पटोले यांनी काय इशारा दिलाय?

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठवला आहे. या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद असतील, लवकर त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल, असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी ‘लोकमत’ ला सांगितलं.  ज्यांनी कालच्या निवडणुकीत पक्षाची साथ सोडली त्यांना किंमत मोजावी लागेल. चंद्रकांत हंडोरे जून २०२२ मधील राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हाही काही जणांनी पक्षाशी गद्दारी केलेली होती. त्यावेळी चौकशी समितीही नेमलेली होती, त्यावेळी पक्षाला दगा देणारे आमदार याहीवेळी तसेच वागले. आणखी काही नावे त्यात जोडली गेली, असे पटोले म्हणाले. 

"पक्षाशी निष्ठा न ठेवणाऱ्या लोकांचा कचरा या निमित्ताने गेला, असं मला वाटतं. हे लोक कधीही पक्षाला धोका देऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत यांच्यापैकी एकालाही तिकीट दिले तर तो इंदूर पॅटर्न करून महायुतीसोबत जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापैकी एकालाही विधानसभेचे तिकीट देऊ नये, अशी भूमिका मी पक्षश्रेष्ठींना पाठवलेल्या अहवालात मांडली आहे," अशी माहिती पटोले यांनी दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषदVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Nana Patoleनाना पटोले