शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

मी पुन्हा आलोच, यांनाही घेऊन आलो; 'मी पुन्हा येईन'वरून टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 13:09 IST

फडणवीस म्हणाले, त्यावेळी ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार, 'मी त्यांना माफ केले', हाच माझा बदला आहे.

एकनाथ शिंदे सरकारने आज (सोमवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. या बहुमत चाचणीत भाजप- शिवसेना शिंदे गटाला १६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी, सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. यानंतर, आभारपर भाषण करताना फडणवीस यांनी विरोधकांवर जोर दार हल्ला चढवला. "मविआचे सरकार आले, तेव्हा मी म्हणत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे. तेव्हा मी एक कवीता म्हटली होती. त्यातून 'मी पुन्हा येईन', असे म्हटले होते. पण तेव्हा माझी बरीच टिंगल टवाळी झाली. पण मी पुन्हा आलो, एकटाच आलो नाही, तर यांनाही घेऊन आलो", असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार -फडणवीस म्हणाले, त्यावेळी ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, मी त्याचा बदला घेणार, 'मी त्यांना माफ केले', हाच माझा बदला आहे. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. कारण राजकारणात सर्वांचेच दिवस येत असतात. 

सत्ता आमचे साध्य नाही, साधन आहे -आमच्याकडे बहुमत असतानाही आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले. पण आम्ही  विचलित झालो नाही. जनतेचे प्रश्न मांडले. कोरोना काळातही जनतेत राहिलो. जीवाची परवा केली नाही. अनेकांना वाटले की आम्ही सत्तेसाठी करतोय. पण आमचे साध्य सत्ता नाही. तर ते आमचे साधन आहे. जेव्हा सरकार जाईल तेव्हा पर्यायी सरकार येईल, असेही मी त्यावेळी म्हटले होते, याची आठवणही फडणवीस यांनी यावेळी करू दिली.

...त्या पक्षाने मला घरी बसण्याचाही आदेशही दिला असता तरी मी बसलो असतो -मोदीजींनी दाखवून दिले की सत्ता महत्वाची नाही. मात्र आम्हाला बहुमत असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागले. आता आम्ही, पुन्हा सरकार बनवले आणि जनतेची इच्छा पूर्ण केली. ज्या पक्षाने मला सर्वोच्च स्थानावर बसवले त्या पक्षाने मला घरी बसण्याचाही आदेशही दिला असता तरी मी बसलो असतो, असेही फडणवीस म्हणाले.

कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता -यावेळी फडणवीस यांनी एक शेरही म्हणून दाखवला... ते म्हणाले -"यावेळी फडणवीस यांनी एक शेरही -दुनिया का हर शौक पाला नहीं जाताकांच के खिलौनों को उछाला नहीं जातामेहनत करने से मुश्किल हो जाती है आसानक्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता" 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी