शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

गुप्तचर यंत्रणेची शोधाशोध; महाराष्ट्रात ना डेरा, ना सौदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:57 PM

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात आपले मायाजाल निर्माण करणारा डेरा सच्चा सौदा प्रमूख बाबा राम रहीम याच्या प्रकरणाचे हिंसक लोण...

नरेश डोंगरेनागपूर : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात आपले मायाजाल निर्माण करणारा डेरा सच्चा सौदा प्रमूख बाबा राम रहीम याच्या प्रकरणाचे हिंसक लोण महाराष्ट्रात पसरू शकते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा यंत्रणांनी तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे महाराष्ट्रात या प्रकरणाचे कुठेही हिंसक पडसाद उमटले नाही. मुंबईसह अन्य एक-दोन नगरात बाबा राम रहीमचे बोटावर मोजण्याएवढे समर्थक होते. त्यांनी या प्रकरणात राळ उठविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना लगेच थंड केले.साध्वी बलात्कार प्रकरणात राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याच्या कथित समर्थक गुंडांनी पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानातील काही भागात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक, तोडफोड, जाळपोळीचे हिंसक लोण पसरल्याने या तीन राज्यात अनेकांचे बळी गेले आणि ५० पेक्षा जास्त जखमी झाले. कोट्यवधींच्या मालमत्तेचीही हानी झाली. देशातील अन्य राज्यात हे लोण पसरू नये म्हणून गुप्तचर यंत्रणांनी ठिकठिकाणच्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट दिला.

महाराष्ट्रात विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या आगमनाची धूम सुरू असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर शुक्रवारी थोडासा ताण होता. तशात राम रहीमच्या प्रकरणावरून समाजकंटकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा डाव टाकला जाऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे राज्यात बाबा राम रहीमचे समर्थक कोणकोणत्या भागात आहेत, त्याची तातडीने माहिती काढण्यात आली. बहुतांश मोठ्या शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम रहीमच्या समर्थकांची माहिती संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, राज्यातील नवी मुंबईसह एक दोन ठिकाणच्या बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्तींचा अपवाद वगळता राज्यातील कोणत्याही भागात राम रहीमचे मायाजाल नसल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले. त्यामुळे राज्याच्या सुरक्षा यंत्रणांवरचा ताण कमी झाला. मात्र, नवी मुंबई, मुलुंड आणि नांदेडमध्ये राम रहीमच्या कथित समर्थकांकडून हिंसक कारवाया घडवून आणण्याची भीती या शोधमोहिमेतून अधोरेखित झाली होती. त्यामुळे या नगरात सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या. अचानक त्या नगरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. हे करतानाच अफवा पसरणार नाही, याची खास काळजी घेण्यात आली.त्याचे चांगले परिणाम समोर आले. उल्लेखित भागात एक-दोन ठिकाणी राम रहीमचे समर्थक बैठका घेऊन काहींना चिथावणी देण्याची तयारी करीत असल्याचे लक्षात येताच त्यांना लगेच थंड करण्यात आले. त्यांच्या व्यतिरिक्त कुणाला त्याचा थांगपत्ताही लागू शकला नाही.विदर्भात नाही सापडला समर्थकपंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानातील काही भागात हिंसक घटनांनी अराजक निर्माण झाले असताना नागपूर - विदर्भात पोलीस, गुप्तचर यंत्रणा राम रहीमच्या समर्थकांची शोधाशोध करीत होत्या. मात्र, राम रहीमचा एकही समर्थक पोलिसांना गवसला नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाºयांची प्रतिक्रिया मिश्किल होती. आम्हाला तर सापडतच नाही, तुमच्या लक्षात कुणी राम रहीमचा कथित समर्थक असल्यास आम्हाला कळवा, असे वरिष्ठ अधिकारी म्हणत होते.न्यायालयाने दोषी ठरविलेल्या एखाद्या आरोपीच्या समर्थनार्थ गुंडगिरी करून अनेकांचे बळी घेणे, अनेकांना जखमी करणे, जाळपोळ, तोडफोड करणे यात कसली आली श्रद्धा? महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. चांगले काय, वाईट काय, याचे आम्हाला भान आहे. त्यामुळे असल्या कुप्रवृत्तीला येथे समर्थन मिळण्याचा प्रश्नच उरत नाही. त्याचमुळे महाराष्ट्रात बाबा राम रहीमचे कुठे समर्थक दिसून आले नाहीत. - संजय बर्वेअतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई

टॅग्स :Policeपोलिस