Jobs at Maharashtra Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला ५,१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. तसेच 'एमपीएससी'द्वारे निवड झालेल्या ५,१२२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या माध्यमातून ऐतिहासिक एकाच दिवशी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली आहेत. परिणामी येत्या ४ ऑक्टोबरला अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी एमपीएससीतर्फे निवड झालेल्या उमेदवारांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एकाचवेळी तब्बल १० हजारांहून अधिक उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाती घेतलेल्या १०० आणि १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा मुलास अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. परंतु तांत्रिक अडचणी व इतर विलंबामुळे अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. ही संवेदनशील बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना देऊन सातत्याने आढावा घेतला. त्यानंतर नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले आणि त्यामुळेच एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळणार आहेत.
सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात
यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टंकलेखक श्रेणीतील ५१२२ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.
विभाग | उमेदवार |
कोकण विभाग | ३०७८ |
विदर्भ विभाग | २५९७ |
पुणे विभाग | १६७४ |
नाशिक विभाग | १२५० |
मराठवाडा विभाग | १७१० |
Web Summary : Maharashtra government will induct 10,309 candidates into government service on October 4th. This includes 5,187 through compassionate grounds and 5,122 selected by MPSC. This historic recruitment drive addresses long-pending cases, marking a significant administrative reform.
Web Summary : महाराष्ट्र सरकार 4 अक्टूबर को 10,309 उम्मीदवारों को सरकारी सेवा में शामिल करेगा। इसमें 5,187 अनुकंपा आधार पर और 5,122 एम.पी.एस.सी. द्वारा चयनित शामिल हैं। यह ऐतिहासिक भर्ती अभियान लंबे समय से लंबित मामलों का समाधान करता है, जो एक महत्वपूर्ण प्रशासनिक सुधार है।