HSRP New Deadline: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी नवी डेडलाईन; वाहनचालकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 23:17 IST2025-03-20T23:17:21+5:302025-03-20T23:17:56+5:30
एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. परंतु २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही ही नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.

HSRP New Deadline: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी नवी डेडलाईन; वाहनचालकांना दिलासा
मुंबई - राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. परंतु अद्याप जुन्या वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवण्याचं काम संथगतीने सुरू असल्याने ही मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या परिवहन खात्याने याबाबत परिपत्रक काढून ३० जून २०२५ पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ दिली आहे.
देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट देणे बंधनकारक केले आहे. तेव्हापासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. परंतु २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही ही नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.
राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १ कोटी २५ लाख वाहनांवर हाय स्पीड प्लेट बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील आरटीओ कार्यालयांत तीन झोनमध्ये ३ वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार तीन झोनमध्ये अनुक्रमे १२, १६ आणि २७आरटीओ कार्यालयांचा समावेश आहे. या वाहनांवर आता ३० जून २०२५ पूर्वी एचएसआरपी बसविणे बंधनकारक असून त्यानंतर एचएसआरपी नसलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अशी असते एचएसआरपी
अॅल्युमिनियमपासून बनलेली
जाडी १ मिलीमीटरपेक्षा थोडी अधिक
क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक
होलोग्राम खाली लेझर बैंडेड १० अंकी पिन कोड असतो