बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर

By Admin | Updated: June 2, 2014 22:32 IST2014-06-02T22:03:35+5:302014-06-02T22:32:33+5:30

बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे.

HSC result: Pune division in fifth position in the state | बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर

बारावी निकाल : राज्यात पुणे विभाग पाचव्या स्थानावर

पुणे : बारावी परीक्षेच्या निकालात राज्यातील एकुण नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. विभागाचा निकाल ९०.७३ टक्के लागला असून अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. राज्याप्रमाणेच पुणे विभागातही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी पुणे विभागाचा निकालही राज्याप्रमाणे सर्वाधिक लागला आहे.
पुणे विभागातून बारावी परीक्षेसाठी एकुण २ लाख २ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २ हजार ५१० जणांनी परीक्षा दिली. तर १ लाख ८३ हजार ७३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तार्णतेची टक्केवारी ९०.७३ एवढी आहे. राज्यातील निकालामध्ये अनुक्रमे कोकण, अमरावती, कोल्हापूर व औरंगाबाद या विभागापाठोपाठ पुणे विभागाचा क्रमांक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा विभागाचा निकाल ३१.१९ टक्के इतका लागला आहे. विभागात १ लाख १४ हजार ६०५ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ४५० मुले उत्तीर्ण झाली असून उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६५ टक्के एवढे आहे. मुलींमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या ८७ हजार ९०५ मुलींपैकी ८३ हजार २८१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
पुणे विभागात अहमदनगर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२.५८ टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्हा ९०.४९ आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.०२ टक्के इतका लागला आहे. मुलींंच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही अहमदनगर जिल्ह्यात जास्त आहे. शाखानिहाय निकालामध्ये पुणे विभागात विज्ञान शाखेचा निकाल ९४.४८ टक्के, कला शाखेचा ८५.३१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.०२ तर एमसीव्हीसीचा ९१.३४ टक्के निकाल आहे.

जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी
जिल्हा टक्केवारी

पुणे

मुले८७.२८
मुली९४.२८
एकुण९०.४९

अहमदनगर

मुले८९.९४
मुली९६.३५
एकुण९२.५८

सोलापूर

मुले८५.६८
मुली९३.९८
एकुण८९.०२

पुणे विभागाची मागील सात वर्षाच्या निकालाची टक्केवारी
वर्षटक्केवारी
२०१४ ९०.७३
२०१३ ७५.७७
२०१२ ७५.७४
२०११ ७३.५९
२०१० ७७.२०
२००९ ८१.८५
२००८ ८९.७२
२००७ ७१.०९
 

Web Title: HSC result: Pune division in fifth position in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.