खुनाच्या अफवेने हावड़ा एक्सप्रेस शेगावात थांबवली
By Admin | Updated: April 25, 2016 15:08 IST2016-04-25T15:08:41+5:302016-04-25T15:08:41+5:30
अहमदाबाद येथून हावड़ाला जाणा-या 12833 या एक्सप्रेसमधील जनरल डब्यात खून झाला असून तात्काळ मदत पोहचवा असा कॉल दुपारी बाराच्या सुमारास भुसावळ रेल्वे पोलिसांना आल्याची घटना घडली.

खुनाच्या अफवेने हावड़ा एक्सप्रेस शेगावात थांबवली
शेगाव, दि. २५ - अहमदाबाद येथून हावड़ाला जाणा-या 12833 या एक्सप्रेसमधील जनरल डब्यात खून झाला असून तात्काळ मदत पोहचवा असा कॉल दुपारी बाराच्या सुमारास भुसावळ रेल्वे पोलिसांना आल्याची घटना घडली.
या घटनेनंतर, सदर कॉल ची गंभीरता लक्षात घेता पोलिस सतर्क झाले. मात्र एक्सप्रेसने मलकापुर सोडल्याने याबाबतची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांना देण्यात आली. दुपारी 1 वाजता ही गाडी शेगाव स्थानकावर आली असता रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने सयुंक्तरित्या शोध मोहीम राबवून गाडीच्या मागील बाजूस असलेल्या जनरल डब्यांची तपासणी केली. मात्र या डब्यांमधे खून झाल्याचे आढळून आले नाही. पोलिसांनी तसे जबाब प्रवाशांचे नोंदवून गाडी पुढे रवाना केली. दरम्यान अर्धातास गाडी शेगाव स्थानकावर थांबविण्यात आली होती. शेगाव रेल्वे पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार एम.डी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी डब्यांची तपासणी केली.