शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Ajit Pawar: पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे कशी काय शोधणार? अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:55 IST

नद्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अतिक्रमाकडेही वेधलं लक्ष

Ajit Pawar: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. या सरकारचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजताना दिसत आहे. अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप यामुळे चर्चेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची पावसाळी अधिवेशनात कसोटी लागताना दिसत आहे. तशातच आधीच्या सरकारचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अधिवेशनात राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच एक सवाल आज अजित पवार यांनी या सरकारला विचारला.

राज्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती आली होती. अशा वेळी कृषिप्रधान महाराष्ट्रात अनेक शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन व दुधदुभत्याचा व्यवसाय करतात. यंदा झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरात बऱ्याच शेतकऱ्यांची दुभती जनावरेही वाहून गेल्याचे निदर्शनास आले. पण नुकसान भरपाईच्या नियमानुसार त्या जनावरांबाबत काही निकष तयार करण्यात आले आहेत. अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांबाबत NDRF चे निकष जाचक आहेत. कारण पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरे कशी काय शोधणार? असा सवाल करत, या बाबतीत निकष बदलून मदत करावी, अशी मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारला केली.

महाराष्ट्रातल्या अनेक भागात नद्यांमध्ये अतिक्रमण होत आहे. नदीत राडारोडा टाकला जातोय. त्यामुळे नदीचे पात्र उथळ होत आहे. चंद्रपूर शहरात तर ही समस्या गंभीर झाली आहे. नदीमधील अतिक्रमण रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच पूरामुळे खचलेल्या विहिरी दुरुस्त करुन देण्यासाठी मनरेगा म्हणून मदत दिली पाहिजे. पिक कर्ज माफ केले पाहिजे. ज्या घरांचे नुकसान झाले त्यांनाही मदत दिली पाहिजे. घर पूर्ण पडले किंवा अंशतः पडले तरच मदत दिली जाते. पण काही घरांना ओलावा येऊन भेगा पडतात. अशा घरांनाही मदत देण्यासाठी पंचनामे केले पाहिजेत. या अतिवृष्टीच्या काळात गोगलगायीचा प्रादुर्भाव मराठवाड्यात पाहायला मिळाला. आपल्या मदतीच्या निकषांमध्ये गोगलगायीने पिकांचे नुकसान केल्यास मदतीची तरतूद नाही. त्यामुळे याबाबीचा वेगळा निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असा सल्ला अजितदादांनी दिला.

सरकारने कॅबिनेट बैठकीनंतर NDRFच्या निकषानुसार दुप्पट मदत दिली असे सांगितले मात्र त्यात तथ्य नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री अशोक चव्हाण आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. त्यावेळी NDRFचे निकष बदलण्याची मागणी केली होती. तेव्हा पंतप्रधानांनी सकारात्मक रिप्लाय दिला होता. त्यामुळे या मागणीचा पाठपुरावा आताच्या सरकारने करावा. मागच्या वर्षी पेक्षा जास्त ऊसाचे पिक यंदा झाले आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर ऐवजी १ ऑक्टोबर रोजी साखर कारखाने सुरु करावेत. मागच्या वर्षीचा सर्व ऊस संपला नाही. त्या अनुभवावरुन यावर्षी लवकर कारखाने सुरु करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी